बंगळुरू : यंदाच्या सणासुदीच्या हंगामात डिजिटल गिफ्ट कार्डच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० टक्के वाढ झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्नॅपडील कंपनीने म्हटले की, मोठ्या शहरांत गिफ्ट कार्ड अधिक लोकप्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. चारपैकी तीन गिफ्ट कार्ड मेट्रो शहरांत राहणाऱ्या व्यक्तींकडून खरेदी केली जात आहेत.सर्वाधिक लोकप्रिय गिफ्ट कार्डांत उबेर गिफ्ट कार्ड आघाडीवर आहे. हे कार्ड उबेर राइड्स आणि उबेर इट्सवर १० टक्के बचतीची सवलत देते. याचप्रमाणे, मेक माय ट्रिपच्या गिफ्ट कार्डांनाही मोठी मागणी आहे. या कार्डवर सर्व हॉटेल्स आणि विमान तिकिटांच्या बुकिंगवर १० टक्के सूट आहे. बुक माय फॉरेक्स कार्डावर विदेशी चलनाच्या खरेदीवर १० टक्के सूट मिळते. मेट्रो शहरांमध्ये लोकप्रिय असलेल्या अन्य गिफ्ट कार्डांमध्ये गॅप, नॉटिका व एअरोपोस्टल इत्यादींचा समावेश आहे. ही कार्डे ग्राहकांना २२ टक्क्यांपर्यंत सूट देतात. याशिवाय मोठी सूट देणाºया अनेक कंपन्यांची डिस्काउंट कूपन्स ग्राहकांत लोकप्रिय आहेत. लेवीस (१० टक्के), फ्लाइंग मशिन (१५ टक्के), अॅलेन सोली (७ टक्के), जिवामे (५ टक्के) या फॅशन ब्रँडस्चा त्यात समावेश आहे. (वृत्तसंस्था)बुक माय शोच्या डिस्काउंट कार्डवर १० टक्के सूट आहे. एक दिवसासाठी मौजमस्ती करू इच्छिणाऱ्यांकरिता इमॅजिकाचा १२ टक्के सवलतीचा प्रस्ताव आहे. डोमिनोजवरील खरेदीवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळविण्यासाठी ग्राहक गिफ्ट कार्ड खरेदी करू शकतात.
डिजिटल गिफ्ट कार्डच्या विक्रीत ३00 टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:50 AM