नवी दिल्ली - डिजिटलीकरणामुळेभारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली, असे केंद्र सरकारच्या अर्थविभागाने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था-एक आढावा’ असे या अहवालाचे नाव आहे. अहवालात म्हटले आहे की, मागील ९ वर्षांत करण्यात आलेल्या सर्व सुधारणांत तंत्रज्ञान व डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या वापराचे एक आंतरिक सूत्र राहिले आहे.
व्यापक व्यवहारीकरण, अधिक वित्तीय समावेशकता आणि अधिक आर्थिक संधीची उपलब्धता याबाबतीत भारताने वापरलेले डिजिटलीकरणाचे सूत्र जगातील अन्य अर्थव्यवस्थांसाठी एक प्रतिमान (मॉडेल) म्हणून पुढे आले आहे. आर्थिक देवाणघेवाणीसह आरोग्य क्षेत्राला डिजिटलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याची माहिती यात दिली आहे.
- ३४ लाख कोटी रुपयांचा लाभ लाभार्थांनी आधारमुळे थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे झाला. - ५०% पेक्षाही अधिक इंटरनेट संपर्क देशात झाला आहे. २०१४ तुलनेत हे प्रमाण ३ पट अधिक आहे.- २०० कोटींपेक्षा अधिक लोकांची डिजिटल पडताळणी आधारद्वारे दर महिन्याला केली जाते.- २२१कोटी कोरानाचे डोस कोविड काळातील कोविन ॲपच्या सहाय्याने देण्यात आले. हे ही डिजिटल क्रांतीचेच यश आहे.
डिजिटल पायाभूत सुविधा ठरल्या लाभदायीnअहवालात म्हटले आहे की, भारताने डिजिटल पायाभूत सुविधा उभ्या केल्या. त्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडून आले.nडिजिटल ओळख, वित्तीय संपर्क सुधारणा, बाजार संपर्क, देवघेवीच्या खर्चातील कपात आणि कर संकलनातील सुधारणा यांचा त्यामध्ये समावेश आहे. nत्यामुळे शाश्वत आणि तात्कालिक अशा दोन्ही प्रकारच्या आर्थिक वृद्धीला आधार मिळाला. इंटरनेटचा विस्तार, वित्तीय समावेशकता आणि वंचित घटकास थेट लाभाचे हस्तांतरण याचाही अर्थव्यवस्थेच्या वाढीला मोठा लाभ झाला. समीक्षा अहवालात म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक क्षेत्राच्या बदलात आधारची मदतझाली आहे.