Join us

फीचने घटविला वृद्धीदराचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:42 AM

मानक संस्था फीचने भारताच्या जीडीपीचा वृद्धीदर अंदाज घटवून ७.२ टक्के केला आहे.

नवी दिल्ली : मानक संस्था फीचने भारताच्या जीडीपीचा वृद्धीदर अंदाज घटवून ७.२ टक्के केला आहे. भांडवल पुरवठ्याचा वाढता खर्च आणि कमी झालेली कर्ज उपलब्धता यामुळे भारताचा वृद्धीदर अंदाज कमी करण्यात येत असल्याचे फीचने म्हटले आहे.फीचने जारी केलेल्या ‘जागतिक आर्थिक भविष्यदृश’ या अहवालात म्हटले आहे की, भारताचा वृद्धीदर २0१९-२0 आणि २0२0-२१ या वित्त वर्षासाठी अनुक्रमे ७ टक्के व ७.१ टक्के राहील. फीचने जूनमध्ये जारी केलेल्या अंदाजात चालू वित्त वर्षातील भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के राहील, असे अनुमानित केले होते. २0१९-२0 साठी ७.५ टक्के इतका वृद्धीदर अनुमानित केला होता.