Dindigul Farm IPO: डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्सच्या शेअर्सना गुरुवारी बीएसई एसएमईवर जबरदस्त लिस्टिंग मिळालं. बीएसई एसएमईवर २७ जून रोजी कंपनीचा शेअर ५४ रुपयांच्या आयपीओच्या किंमतीपेक्षा ९०% अधिक म्हणजे कंपनीचा शेअर १०२.६० रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग झाल्यानंतर हा शेअर १०० टक्के प्रीमियमसह १०७.७३ रुपयांवर पोहोचला. डिंडीगुल फार्म आयपीओसाठी प्राइस बँड ५१-५४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
काय आहेत डिटेल्स?
किरकोळ गुंतवणूकदारांना दोन हजार शेअर्ससाठी किमान १.०८ लाख रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक होतं. तसंच हाय नेटवर्थ व्यक्तींसाठी (एचएनआय) प्रत्येकी चार हजार शेअर्सच्या दोन लॉटसाठी किमान गुंतवणूक २.१६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. डिंडीगुल फार्म इनिशिअल पब्लिक ऑफरिंगनं (आयपीओ) बुक बिल्ट इश्यूच्या माध्यमातून ३४.८३ कोटी रुपये उभे केले आहेत. या आयपीओमध्ये एकूण ६४.५ लाख शेअर्स नव्यानं इश्यू करण्यात आले आहेत. डिंडीगुल फार्म्सच्या आयपीओसाठी २० जून ते २४ जून दरम्यान बोली लावता येणार होती.
२५ जून रोजी शेअर्सचं वाटप करण्यात आलं. बीलिन कॅपिटल अॅडव्हायझर्सनं डिंडीगुल फार्म आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहिलं, तर लिंक इनटाइम इंडियानं रजिस्ट्रार म्हणून काम पाहिले. या आयपीओसाठी स्प्रेड एक्स सिक्युरिटीजची मार्केट मेकर म्हणून निवड करण्यात आली होती. २०१० मध्ये सुरू झालेल्या डिंडीगुल फार्म्स संपूर्ण आणि स्किम्ड दुधावर दूध प्रथिने कॉन्सन्ट्रेट्स, स्किम्ड मिल्क पावडर आणि डेअरी व्हाईटनरसह विविध दुग्धजन्य प्रोडक्ट्समध्ये कार्यरत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)