मुंबई : भारतीय शेअर बाजार शुक्रवारी चांगलाच गडगडला. करावरील वाढीव अधिभारापासून सूट मिळण्याच्या विदेशी गुंतवणूकदारांच्या आशा सरकारने धुळीस मिळविल्याने शेअर बाजाराची मनोधारणा बिघडत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक ५६०.४५ अंकांनी डुबकी मारत दिवसअखेर ३८,३३७.०१ अंकांवर आला. या वर्षातील ही दुसरी मोठी घसरण होय. आशियायी विकास बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरात केलेली घट, वाहन विक्रीत मंदीचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.
सेन्सेक्सची ५६० अंकांनी डुबकी
शेअर बाजाराची मनोधारणा बिघडत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक ५६०.४५ अंकांनी डुबकी मारत दिवसअखेर ३८,३३७.०१ अंकांवर आला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:29 AM2019-07-20T06:29:42+5:302019-07-20T06:29:47+5:30