Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची डुबकी!

सेन्सेक्सची डुबकी!

अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि चीनची घसरलेली निर्यात यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४३९पेक्षा जास्त

By admin | Published: October 14, 2016 01:20 AM2016-10-14T01:20:42+5:302016-10-14T01:20:42+5:30

अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि चीनची घसरलेली निर्यात यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४३९पेक्षा जास्त

Dip in the Sensex! | सेन्सेक्सची डुबकी!

सेन्सेक्सची डुबकी!

मुंबई : अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि चीनची घसरलेली निर्यात यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी ४३९पेक्षा जास्त अंकांनी घसरून तीन महिन्यांच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आपटला.
सेन्सेक्स सकाळीच नरमाईने उघडला होता. नंतर तो नकारात्मक टापूतच राहिला. सत्राच्या अखेरीस ४३९.२३ अंकांची अथवा १.५६ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २७,६४३.११ अंकांवर बंद झाला. ही ११ जुलैनंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. सोमवारी सेन्सेक्स २१.२0 अंकांनी वाढला होता. मंगळवारी आणि बुधवारी अनुक्रमे दसरा आणि मोहर्रमच्या सुटीनिमित्त बाजार बंद होते. निफ्टी १३५.४५ अंकांनी अथवा १.५६ टक्क्यांनी घसरून ८,५७३.३५ अंकांवर बंद झाला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, २0 आणि २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे इतिवृत्त बाहेर आले आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेकडून व्याजदरांत वाढ केली जाऊ शकते, असे त्यातील आकडेवारीवरून दिसून येते. त्याच वेळी चीनमधील निर्यात सप्टेंबरमध्ये १0 टक्क्यांनी घसरल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. तसेच चीनची आयातही १.९ टक्क्यांनी घसरली आहे. याचा फटका शेअर बाजारांना बसला.

Web Title: Dip in the Sensex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.