Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

एअर इंडिया एक्स्प्रेसने तीन शहरांतून अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:50 AM2023-12-30T10:50:01+5:302023-12-30T10:50:33+5:30

एअर इंडिया एक्स्प्रेसने तीन शहरांतून अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे.

Direct flights to Ayodhya will start from these three cities Air India Express announced | 'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२.१५ वाजता अयोध्येत बांधलेल्या नवीन विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येच्या या विमानतळाचे नाव महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी, एअर इंडिया एक्सप्रेसने शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी देशातील तीन शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर 

१७ जानेवारी २०२४ पासून बेंगळुरू आणि कोलकाता ते अयोध्या दरम्यान थेट उड्डाणे चालवली जातील, असे एअरलाइन्सने म्हटले आहे. याशिवाय ३० जानेवारीपासून एअर इंडिया एक्स्प्रेस दिल्ली ते अयोध्या दरम्यान थेट विमानसेवा चालवणार आहे.

बेंगळुरू आणि अयोध्या दरम्यानच्या फ्लाइट टाइम टेबलबद्दल माहिती देताना, एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, पहिले फ्लाइट १७ जानेवारी रोजी सकाळी ८.०५ वाजता चालेल, जे सकाळी १०.३५ वाजता अयोध्येला पोहोचेल. तर विमान अयोध्येहून दिवसाला ३.४० मिनिटांनी उड्डाण करेल आणि ६.१० मिनिटांनी बेंगळुरूला पोहोचेल. अयोध्येहून पहिले विमान १७ जानेवारी रोजी सकाळी ११.०५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी १२.५० वाजता कोलकात्याला पोहोचेल. तर एअर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट कोलकाता येथून दिवसातून १.२५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि अयोध्येला ३.१० मिनिटांनी पोहोचेल.

महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम विमानतळासाठी नवीन उड्डाणांची माहिती देताना, एअर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी अंकुर गर्ग म्हणाले - देशातील प्रत्येक भागात विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा एअर इंडिया एक्सप्रेसचा नेहमीच प्रयत्न असतो. अयोध्येला उड्डाणांची मागणी लक्षात घेऊन, आम्ही देशातील तीन प्रमुख शहरांमधून थेट उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात आधी दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू हे शहर आहेत. 

आज ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी अयोध्येच्या विमानतळाचे अनावरण करणार आहेत. या खास प्रसंगी इंडिगोचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे.  कंपनीने स्पष्ट केले आहे की, ६ जानेवारी २०२४ पासून व्यावसायिक विमान सेवा सुरू होईल. इंडिगो ११ जानेवारी २०२४ पासून अहमदाबाद आणि अयोध्या दरम्यान उड्डाणे सुरू करणार आहे.

Web Title: Direct flights to Ayodhya will start from these three cities Air India Express announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.