Lokmat Money > बिझनेस न्यूज > थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड्स? जास्त पैसा नेमका कोणाकडून?

थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड्स? जास्त पैसा नेमका कोणाकडून?

शेअर बाजाराचा योग्य अभ्यास केला तर थेट गुंतवणूक हा  पर्याय उत्तम राहील; परंतु तितका वेळ आपल्याकडे नसेल तर म्युच्युअल फंड्स हाच पर्याय सर्वोत्तम.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:47 AM2022-07-04T05:47:08+5:302022-07-04T05:48:14+5:30

शेअर बाजाराचा योग्य अभ्यास केला तर थेट गुंतवणूक हा  पर्याय उत्तम राहील; परंतु तितका वेळ आपल्याकडे नसेल तर म्युच्युअल फंड्स हाच पर्याय सर्वोत्तम.

Direct stock market or mutual funds? Who exactly makes the most money? | थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड्स? जास्त पैसा नेमका कोणाकडून?

थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड्स? जास्त पैसा नेमका कोणाकडून?

गुंतवणूकदारांकडे शेअर बाजारात रक्कम गुंतविण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून आणि दुसरा थेट शेअर बाजारात इक्विटीच्या माध्यमातून. बहुतांश गुंतवणूकदार  नक्की काय करावे याबाबत संभ्रमित राहतात. दोन्ही पद्धतीतील गुंतवणुकीचे फायदे नेमके कोणते, ते पाहू यात.

म्युच्युअल फंड्सचे फायदे काय?

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) बँक मॅन्डेटद्वारे प्रत्येक महिन्यात म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम गुंतविल्याने हमखास बचत होते आणि पैसे गुंतविले जातात. बाजारातील चढ-उतार यामुळे म्युच्युअल फंड्सची एनएव्हीवर खाली होत असल्याने मिळणारे युनिट्स त्यानुसार कमी-जास्त होत असतात. यामुळे गुंतवणुकीचे ॲव्हरेजिंग होत असते.

म्युच्युअल फंड्स नेमके कोणते निवडावेत याबाबत तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार योग्य सल्ला देऊ शकतात. म्युच्युअल फंडमध्ये अनेक स्कीम्स असतात आणि गरजेनुसार प्रसंगी स्कीम पोर्टसुद्धा करता येऊ शकते. म्युच्युअल फंड्स मॅनेजर आणि टीम अनुभवी आणि तज्ज्ञ असते, कंपनी फंडामेंटल्सचा योग्य अभ्यास करून गुंतवणुकीचे नियोजन करीत असतात आणि गुंतवणूकदारांना योग्य परतावा देण्यासाठी प्रयत्नशील असतात. दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे.

थेट शेअर बाजारातील गुंतवणुकीचे फायदे

चांगल्या कंपन्यांची निवड करून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास शेअरच्या भावातील वाढीच्या माध्यमातून उत्तम परतावा मिळू शकतो.
बोनस शेअर्स, शेअर स्प्लिट्स या माध्यमातून गुंतवणूक मल्टी फोल्ड वाढू शकते. डिव्हिडंडच्या माध्यमातून अतिरिक्त परतावा मिळतो.
चांगल्या कंपन्यांमधील दीर्घकालीन गुंतवणूक म्युच्युअल फंड्सपेक्षा अधिक रिटर्न्स देऊ शकते.

यासाठी आवश्यक गोष्टी
कंपनी फंडामेंटल्सबाबत योग्य माहिती असणे आवश्यक, टेक्निकलच्या माध्यमातून गुंतवणूकची एंट्री योग्य वेळेस आहे का याची खात्री करता येणे आवश्यक.

 

Web Title: Direct stock market or mutual funds? Who exactly makes the most money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.