भारतात आता स्मार्ट टीव्हीचे राज्य आले असले तरी आजही डीटीएच म्हणजे ‘डायरेक्ट टू होम’ सेवा घेणारे तब्बल ५.५ कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यांना सेवा देणाऱ्या कंपन्यांत मुख्य हिस्सा आहे तो टाटा आणि वॉल्ट डिस्ने यांच्या भागीदारीतील टाटा प्ले चा! त्यामागोमाग एअरटेल, डीश टीव्ही आणि सन डायरेक्ट यांची हिस्सेदारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक असलेली भारत ही डीटीएच टीव्हीची जगातली सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. आता ग्राहक ‘ओटीटी’कडे सरकत असल्याने या कंपन्यांनीही त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
डायरेक्ट टू होम सेवा : भारताच्या छपरांवर कोणत्या टीव्हीच्या छत्र्या? या आहेत प्रमुख हिस्सेदार कंपन्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 08:57 IST