Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘कॅशलेस’साठी १०० रुपयांपर्यंत सवलत !

‘कॅशलेस’साठी १०० रुपयांपर्यंत सवलत !

‘कॅशलेस’ पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना कमाल विक्री किमतीवर (एमआरपी) १०० रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:47 AM2018-04-30T05:47:08+5:302018-04-30T05:47:08+5:30

‘कॅशलेस’ पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना कमाल विक्री किमतीवर (एमआरपी) १०० रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता आहे.

Discount for 'Cashless' 100! | ‘कॅशलेस’साठी १०० रुपयांपर्यंत सवलत !

‘कॅशलेस’साठी १०० रुपयांपर्यंत सवलत !

नवी दिल्ली : ‘कॅशलेस’ पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना कमाल विक्री किमतीवर (एमआरपी) १०० रुपयांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता आहे. यासह डिजिटल व्यवसाय करणाºया विक्रेत्यांनाही ‘कॅशबॅक’ची सुविधा दिली जाणार आहे. याबाबत जीएसटी परिषदेद्वारे सरकार तयारी करीत आहे.
ग्राहकांना डिजिटल व्यवहारांकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येऊ शकेल, यासंबंधी अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये तीन पद्धतीने प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली.

प्राप्तिकर, व्यवसाय करासारख्या प्रत्यक्ष कराचा भरणा करणाºयांनाही सवलत देण्याबाबत बैठकीत विचार करण्यात आला आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना डिजिटल पद्धतीने (भीम अ‍ॅप, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे) पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना १०० रुपयांपर्यंत सवलत देण्यावर एकमत झाले. तसेच अधिकाधिक विक्रेत्यांना डिजिटल पेमेंटच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनाही विशेष प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. त्याअंतर्गत विक्रेत्यांना एकूण वार्षिक उलाढालीवर ठराविक रक्कम ‘कॅशबॅक’ स्वरुपात परत मिळणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडून लवकरच जीएसटी परिषदेसमोर ठेवला जाणार आहे.

Web Title: Discount for 'Cashless' 100!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.