मुंबई : एकापेक्षा अधिक घरे असलेल्या करदात्यांना कर सवलत मिळविण्यासाठी आपल्या वापरातील (सेल्फ आॅक्युपाइड) घर बदलून घेण्याचा हक्क आहे, असा निर्णय प्राप्तिकर अपील लवादाच्या मुंबई खंडपीठाने दिला आहे.एकापेक्षा अधिक घरे असलेल्या करदात्यांना कोणतेही एक घर आपल्या वापरात असल्याचे दाखवून त्यावरील वार्षिक मूल्य शून्य दाखविता येते. त्यातून करदात्यांना गृहीत घरभाड्यावर कर लागत नाही. ज्या घरात तो राहत नाही, त्यावर नियमानुसार भाड्याचे उत्पन्न गृहीत धरले जाते. तसेच या उत्पन्नावर प्राप्तिकर लावला जातो. करपात्र घर प्रत्यक्षात भाड्याने दिले नसले तरीही उत्पन्न गृहीत धरून प्राप्तिकर लावला जातो. या पार्श्वभूमीवर लवादाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.लवादाच्या निर्णयानुसार, करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्रात एक घर स्वत:च्या वापरात असल्याचे दर्शविले असले तरी नंतर प्रत्यक्ष कर आढाव्याच्या वेळी तो वापरात दुसरे घर असल्याचे दाखवू शकतो. हे दुसरे घर आधीच्या घरापेक्षा तुलनेत अधिक चांगल्या वसाहतीतील असू शकते.चांगले घर, कमी करअधिक चांगल्या वसाहतीतील घर वापरात दाखविल्यास त्याला कमी कर लागेल. कारण अधिक चांगल्या वसाहतीतील घराचे गृहीत भाडे अधिकच असणार आहे.
दुसऱ्या घरावरही मिळणार करदात्याला सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:04 AM