Join us

RBI गव्हर्नर म्हणाले, "क्रिप्टोकरन्सीवर विचार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरु"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 3:59 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, परंतु त्याचा सामना करण्यासाठी यावेळी अतिरिक्त उपाय: दास

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, परंतु त्याचा सामना करण्यासाठी यावेळी अतिरिक्त उपाय: दासआम्ही क्रिप्टोकरन्सीबाबत आपल्या चिंता सरकारला सांगितल्याचं शक्तिकांत दास यांचं मत

सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचं खासगीकरण करण्यात येणार असून काही दिवसांपूर्वी बँकांच्या संघटनांनी याविरोधात संपही पुकारला होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत मोठी माहिती दिली. "आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाबाबत सरकारसोबत चर्चा करत आहोत. यासंदर्भातील प्रक्रिया पुढे नेली जाईल," असं दार म्हणाले. गुरूवारी त्यांनी याबाबत माहिती दिली. प्रभवी पद्धतीनं सर्व्हिस डिलिव्हरीबाबात आर्थिक क्षेत्रात नवे मार्ग तयार केले पाहिजेत. याबाबत काही प्रभावी नियमांची गरज आहे जे फिनटेक स्पेसमध्ये इनोव्हेशनला प्रोत्साहित करण्याऐवजी त्याची मदत करतील असं मत दास यांनी व्यक्त केलं. "रिझर्व्ह बँकेसाठी इफेक्टिव्ह रेग्युलेशनला प्राधान्य आहे. याव्यतिरिक्त मजबूत भांडवलाच्या आधारे बँकिंग क्षेत्राला मजबूत ठेवणं आणि एथिक्स ड्रायवेन गव्हर्नन्सदेखील रिझर्व्ह बँकेच्या धोरणात प्राधान्यक्रमात आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. RTGS आणि NEFT मध्ये आता केवळ रूपयांची देवाणघेवाण करण्यात येते. परंतु अन्य देशांच्या चलनाच्या देवाणघेवाणीसाठीही याची क्षमता वाढवता येऊ शकते. यामध्ये जर काही शोध घेतला गेला तर डॉलरच्या रूपातही पैशांची देवाणघेवाण करता येणार असल्याचंही ते म्हणाले,NEFT-RTGS द्वारे मल्टीकरन्सी ट्रान्झॅक्शन शक्य"तंत्रज्ञान आणि नव्या शोधांमुळे ग्राहकांना उत्तमरित्या आणि तेज गतीनं सेवा देण्यास मोलाची मदत मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेनं लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) उपलब्ध करवण्यासाठी २७४ कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स प्रोसेस केले. यामध्ये सर्वाधिक कोरोनाच्या महासाथीत करण्यात आले," असं दास यांनी नमूद केलं. NEFT-RTGS या कोणत्याही वेळी ग्राहकांना सेवा पुरवण्यात सक्षम आहेत. परंतु त्याला अधिक मजबूत करता येईल. यामध्ये मल्टी करन्सी केपेबलिटीज आहेत. यामध्ये रूपया व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशांच्या चलनामध्ये व्यवहार शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना संकटाचा सामना करण्यास सक्षमरिझर्व्ह बँक फायनॅन्शिअल स्टेबिलिटीशी निगडीत समस्यांचं मूल्यांकन करत आहे. कारण सध्या रिझर्व्ह बँक आपली डिजिटल करन्सी आणण्यावर काम करत आहे. "किमतींची स्थिरता आणि आर्थिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सर्व धोरणात्मक गोष्टींचा वापर करण्यास रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय आहे. परंतु आता देश कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे," असं दास म्हणाले.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दाससरकारबँककोरोना वायरस बातम्या