Join us

BPCLच्या विक्रीत अडथळे! आता 16 नोव्हेंबरपर्यंत EOI जमा करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 3:23 PM

बीपीसीएलसाठी पतपत्र (EOI) सादर करण्याची अंतिम मुदत वारंवार वाढविली जात आहे.

मोदी सरकार देशातील दुसर्‍या क्रमांकाची तेल रिफायनरी कंपनी असलेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)मधील आपला संपूर्ण हिस्सा विकत आहे. परंतु सरकारला अद्याप खरेदीदार सापडलेला नाही. त्यामुळेच बीपीसीएलसाठी पतपत्र (EOI) सादर करण्याची अंतिम मुदत वारंवार वाढविली जात आहे.नवीन अंतिम मुदत 16 नोव्हेंबरबीपीसीएलमध्ये हिस्सा खरेदीसाठी EOI जमा करण्याची मुदत सरकारने 16 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. अधिकृत आदेशानुसार, कोरोना साथीच्या आजारामुळे इच्छुकां(IB)नी केलेली विनंती आणि सद्यस्थिती लक्षात घेता EOI सादर करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2020 (संध्याकाळी 5)पर्यंत वाढविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्ष 2020-21मध्ये सरकारने वेगवेगळ्या कंपन्यांमधील आपला हिस्सा विकून 2.10 लाख कोटी रुपये उभे करण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. एअर इंडिया आणि एलआयसीचादेखील हिस्सा विक्री कंपन्यांच्या यादीत समावेश आहे.चौथ्यांदा अंतिम मुदत वाढवलीसरकारने चौथ्यांदा EOI सादर करण्याची मुदत वाढविली आहे. पूर्वी EOI सादर करण्याची तारीख दोन मे होती, परंतु 31 मार्चला वाढवून ती 13 जून करण्यात आली. 26 मे रोजी ती 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली. यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. आता पुन्हा एकदा 16 नोव्हेंबरपर्यंत संधी दिली जात आहे. EOIच्या माध्यमातून हे माहीत आहे की, कोणत्या कंपन्या किंवा गुंतवणूकदार बोली लावण्यास इच्छुक आहेत.सरकारची 52.98 टक्के भागीदारीबीपीसीएलमध्ये सरकारची एकूण 52.98 टक्के हिस्सेदारी आहे. सरकारचे कंपनीत 114.91 कोटी शेअर्स आहेत जे कंपनीच्या 52.98 टक्के समभागांच्या समतूल्य आहेत. या व्यतिरिक्त कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रणदेखील धोरणात्मक खरेदीदाराकडे वर्ग केले जाईल. कंपनीच्या नुमालीगड रिफायनरीतील 61.65 टक्के भागभांडवलाचा यात समावेश नाही.