Lokmat Money > बिझनेस न्यूज > निर्गुंतवणुकीचा वेग मंदावला..!

निर्गुंतवणुकीचा वेग मंदावला..!

भांडवली बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा फटका केवळ वित्तीय संस्था, मोठे गुंतवणूकदार यांनाच बसला नसून, हा फटका केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणालाही बसला असल्याचे दिसून आले आहे.

By admin | Published: January 29, 2016 03:47 AM2016-01-29T03:47:52+5:302016-01-29T03:47:52+5:30

भांडवली बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा फटका केवळ वित्तीय संस्था, मोठे गुंतवणूकदार यांनाच बसला नसून, हा फटका केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणालाही बसला असल्याचे दिसून आले आहे.

Disinvestment slowed down ..! | निर्गुंतवणुकीचा वेग मंदावला..!

निर्गुंतवणुकीचा वेग मंदावला..!

मुंबई : भांडवली बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा फटका केवळ वित्तीय संस्था, मोठे गुंतवणूकदार यांनाच बसला नसून, हा फटका केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणालाही बसला असल्याचे दिसून आले आहे.
चालू आर्थिक वर्षात सरकारी उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ६९,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचा सरकारचा मानस होता, मात्र चालू आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ दोन महिने राहिले असूनही जेमतेम १२,७०० रुपये जमविण्यात सरकारला यश आले आहे. यामुळे सरकारने आगामी आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यात कपात करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
निर्गुंतवणूक विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, गेल्या दहावर्षांपासून भारतीय भांडवली बाजारामध्ये सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर हालचाल झाली
आहे. किंबहुना अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीच्या किती लक्ष्य निर्धारित केले आहे आणि त्या कंपन्या कोणत्या क्षेत्रातील आहेत, याकडे बाजाराचे लक्ष लागलेले असते. कारण त्यावरही काही प्रमाणात बाजाराची दिशा निश्चित होताना दिसली आहे. परंतु, आता निर्धारित लक्ष्याच्या निम्मीही रक्कम जमा न झाल्याने आधीच अस्थिर असलेल्या बाजारात हिरमोड झाल्याची भावना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disinvestment slowed down ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.