सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये (OTT Platforms) जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी Amazon Prime Video ने आपले प्लॅन्स महाग केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, Netflix ने आपले प्लॅन्स स्वस्त करण्याची घोषणा केली. आता डिस्ने + हॉटस्टारनेही (Disney+ Hotstar) मोठा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्रीतील वाढत्या स्पर्धेदरम्यान, Disney+ Hotstar ने 49 रुपयांचा मंथली रेंटलवाला प्लॅन आणला आहे. दरम्यान, हा प्लॅन 99 रुपयांचाच जुना प्लॅन आहे. परंतु ऑफर अंतर्गत हा प्लॅन 49 रुपयांना खरेदी करता येईल.
ओन्ली टेकच्या रिपोर्टनुसार Disney+ Hotstar सध्या या प्लॅनची काही अँड्रॉईड युझर्ससह चाचणी घेत आहे. कंपनीचा हा लेटेस्ट मोबाइल प्लॅन काही ठराविक पेमेंट्स मोडवर इंट्रोडक्टरी ऑफरसह उपलब्ध आहे. Disney+ Hotstar चा हा प्लॅन अॅड सपोर्टेड आहे. या प्लॅनद्वारे ग्राहकांना आपल्या टॅब किंवा स्मार्टफोनद्वारे उपलब्ध असलेल्या संपूर्ण कंटेन्टला अॅक्सेस करू शकतात.
एका वेळी एकाच डिव्हाईस लॉग इनयाशिवाय एका वेळी एकाच डिव्हाईसवर ग्राहकांना लॉग इन करता येणार आहे. Disney+ Hotstar वर कन्टेन्ट ग्राहकांना एचडीमध्ये पाहता येणार आहे. तसंच Disney+ Hotstar कडे 499 रुपये, 899 रुपये आणि 1499 रुपयांचेही प्लॅन्स आहेत.