मुंबई : मराठी उद्योजक, व्यावसायिकांसाठी ‘मराठी बिझनेस एक्स्चेंज’ हे दोनदिवसीय प्रदर्शन ५ व ६ नोव्हेंबरला मुंबईतील नेहरू एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. फ्रॅन्चायझिंग, स्टार्ट अप, लॉजिस्टिक्स, आधुनिक तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील छोटे व मध्यम उद्योजक, ब्रँडिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, कृषी, डिजिटल मार्केटिंग यावर प्रदर्शन, चर्चासत्र व परिसंवाद होतील. यात सहभागी होण्यासाठी /www.marathibx.com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. यशस्वी मराठी उद्योजक व व्यावसायिक हे नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक मराठी उद्योजक प्रदर्शनाला भेट देण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
मराठी बिझनेस एक्स्चेंजचे ५, ६ नोव्हेंबरला प्रदर्शन
By admin | Published: November 04, 2016 6:02 AM