जिल्हा व्यापारी महामंडळाचा चिनी मालावर बहिष्कार निर्णय : बैठकीमध्ये व्यापार्यांचा निश्चय
By admin | Published: October 22, 2016 10:23 PM
जळगाव : चिनी मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे.
जळगाव : चिनी मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे.देशातील सर्वच राज्यांमध्ये बर्याच व्यापारी संघटनांनी चिनी माल खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात शनिवारी जिल्हा व्यापारी महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ातही चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया, सुरेश चिरमाडे, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी उपस्थित होते. जिल्ातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी चिनी माल खरेदी, विक्री व वापर करू नये तसेच भारतीय उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन काबरा व बरडिया यांनी केले.