- जपासून नागपूर महोत्सवाला थाटात प्रारंभ : पाच दिवस सांस्कृतिक मेजवानी नागपूर : नागपूर महोत्सवावर विघ्न आणणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा महोत्सव होणार की नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण न्यायालयाने या याचिकेवर महापालिकेला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महोत्सव रद्द करण्यासाठी अंतरिम आदेश न्यायालयाने न दिल्याने तूर्तास नागपूर महोत्सवाचे विघ्न टळले आहे. गुरुवारी या महोत्सवाला थाटात प्रारंभ करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी या महोत्सवात स्थानिक कलावंतांना स्थान देण्यात येत आहे. यंदा शैलेश दाणी आणि एम. ए. कादर यांनी स्थानिक कलावंतांचे संयोजन केले आहे, असे पत्रकार परिषदेत मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी सांगितले. नागपूर महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजता यशवंत स्टेडियम, धंतोली येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. २३ जानेवारी रोजी नागपूर सिटी स्टार्स या कार्यक्रमात स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. २४ जानेवारी रोजी रवी चारी, राकेश चौरसिया, नितीन शंकर, संगीत हल्दीपूर आणि शेल्डन व ग्रुपचे नादब्रह्म फ्युजन होईल. २५ जानेवारी रोजी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात हरी ओम पवार, प्रदीप चौबे, सुनीलजोगी, राजा धर्माधिकारी, पॉपुलर मेरठी आणि रश्मी किरण यांचा सहभाग आहे. तर २६ जानेवारी रोजी सुखविंदर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात सांस्कृतिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती नरेंद्र बोरकर यांनी दिली. याप्रासंगी पत्रकार परिषदेला प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे, संदीप जोशी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ॲडमार्क इव्हेण्टसचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महोत्सवाचे विघ्न टळले
- आजपासून नागपूर महोत्सवाला थाटात प्रारंभ : पाच दिवस सांस्कृतिक मेजवानी
By admin | Published: January 22, 2015 12:07 AM2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30