Lokmat Money > बिझनेस न्यूज > Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात उतरताच कमाल केली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी २८७ टक्क्यांहून अधिक तेजीसह १५५ रुपयांवर लिस्ट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:05 AM2024-07-02T11:05:34+5:302024-07-02T11:06:16+5:30

Divine Power IPO: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात उतरताच कमाल केली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी २८७ टक्क्यांहून अधिक तेजीसह १५५ रुपयांवर लिस्ट झाला.

Divine Power IPO 300 percent gain on first day Rs 40 share 160 above Investor huge profit nse listing stock market | Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

Divine Power IPO: डिव्हाइन पॉवर एनर्जी या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात उतरताच कमाल केली आहे. डिव्हाइन पॉवर एनर्जीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं. कंपनीचा शेअर मंगळवारी २८७ टक्क्यांहून अधिक तेजीसह १५५ रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ४० रुपये होती. डिव्हाइन पॉवर एनर्जीचा आयपीओ २५ जून रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २७ जूनपर्यंत खुला राहिला. कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू साइज २२.७६ कोटी रुपये होती.

३०० टक्क्यांपेक्षा अधिक फायदा

धमाकेदार लिस्टिंगनंतर डिव्हाइन पॉवर एनर्जीचा (Divine Power Energy) शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह १६२.७५ रुपयांवर पोहोचला आहे. डिव्हाइन पॉवरच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ३०० टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ४० रुपये होती आणि आता शेअर्सनं १६० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिव्हाइन पॉवर एनर्जीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार आहे. डिव्हाइन पॉवर एनर्जीची सुरुवात २००१ मध्ये झाली.

३९३ पट झालेला सबस्क्राईब

डिव्हाइन पॉवर एनर्जीचा आयपीओ ३९३.६७ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ५०७.९४ पट सब्सक्राइब झाला. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (एनआयआय) कोटा ४७३.७४ पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा १३५.८४ पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये ३००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Divine Power IPO 300 percent gain on first day Rs 40 share 160 above Investor huge profit nse listing stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.