Join us

ना IIT ना IIM, १२वी मध्ये दोनदा नापास; आता उभी केली कोट्यवधींची कंपनी, कोण आहेत मुरली दिवी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 12:43 PM

मुरली दिवी हे हैदराबादचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि ते जगातील सर्वात श्रीमंत वैज्ञानिकांपैकीही एक आहेत.

Success Story: मनात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट मिळवणं कठीण नाही असं म्हणतात. असंच काहीसं घडलं ते हैदराबादच्या एका व्यक्तीसोबत. दिवीज लॅब्सचे (Divi’s Labs) फाऊंडर मुरली दिली कोणत्याही मोठ्या संस्थेतून शिकलेले नाही. परंतु त्यांनी आज जे यशाचं शिखर गाठलंय त्यावरून आयआयएम आणि आयआयटीचे विद्यार्थीही विचारात पडतील. मुरली दिवी हे हैदराबादचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि ते जगातील सर्वात श्रीमंत वैज्ञानिकांपैकीही एक आहेत.

मुरली देवी यांनी एमआयटी, मणिपाल अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशनमधून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल्स सायन्सेसमधून बॅचलर्स ऑफ फार्मसीचा कोर्स केला. फोर्ब्सनुसार मुरली यांची एकूण संपत्ती जवळपास ५३ हजार कोटी रुपये आहे. अॅग्री फार्मास्युटिकल्स इंग्रीडिअंटच्या टॉप १० मॅन्युफॅक्चर्सपैकी एक दिवीज लॅब्सचं मार्केट कॅप जवळपास ९७,४७६ कोटी रुपये आहे. ते आंध्र प्रदेशातील एका छोट्या शहरातून आलेत. त्यांचे वडील एक सरकारी कर्मचारी होते. रिपोर्ट्सनुसार, एक अशीही वेळ होती जेव्हा मुरली दिवी यांचे वडील १० हजार रुपयांच्या पेन्शनवर आपलं घर चालवत होते.

१२ वीत दोनदा अपयशमुरली दिवी यांना १२ वी मध्ये दोनदा अपयश आलं. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि कठोर मेहनत केली. १९७६ मध्ये दिवी वयाच्या २५ व्या वर्षी अमेरिकेत गेले आणि फार्मासिस्ट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. फोर्ब्स इंडियाच्या रिपोर्टनुसार मुरली दिवी जेव्हा अमेरिकेला रवाना झाले तेव्हा त्यांच्याकडे केवळ ५०० रुपये होते. 

४० हजार डॉलर्ससह भारतात परतलेअमेरिकेत ट्रिनिटी केमिकल आणि फाईक केमिकल्ससारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आणि जवळपास ६५ हजार डॉलर्स कमावले. काही वर्षे अमेरिकेत काम केल्यानंतर मुरली दिवी यांनी ४० हजार डॉलर्स घेऊन भारतात परतण्याचा निर्णय घेतला. १९८४ मध्ये मुरली दिवी यांनी केमिनॉर उभारण्यासाठी अंजी रेड्डी यांच्यासह हातमिळवणी केली. २००० मध्ये ही कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये मर्ज करण्यात आली.

८८ बिलयनचा महसूल१९९० मध्ये दिवीज लॅब लाँच करण्यापूर्वी मुरली दिवी यांनी ६ वर्षांपर्यंत डॉ. रेड्डीज लॅबमध्ये काम केलं. १९९५ मध्ये मुरली दिवी यांनी आपला पहिला उत्पादन प्रकल्प चौटुप्पलमध्ये (तेलंगण) सुरू केला. २००२ मध्ये त्यांनी विशाखापट्टणमनजीक दुसरी मॅन्युफॅक्चरींग युटिलिटी सुरू केली. हैदराबाद स्थित डिवीज लॅबनं मार्च २०२२ मध्ये ८८ बिलियनचा महसूल नोंदवला.

टॅग्स :व्यवसाय