Join us

Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 4:12 PM

देशभरात दिवाळीचा प्रचंड उत्साह आहे. मात्र, यंदा दिवाळी २०२४ च्या तारखेबाबत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर बाबत बराच संभ्रम निर्माण झाला आहे.

दिवाळी २०२४ चा सण सुरू झाला आहे. देशभरात दिवाळीचा प्रचंड उत्साह आहे. मात्र, यंदा दिवाळी २०२४ च्या तारखेबाबत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर बाबत बराच संभ्रम निर्माण झाला आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. अशा तऱ्हेने उद्या बाजार बंद राहणार की नाही, याबाबत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. भारतीय शेअर बाजार ३१ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे खुला राहणार असून १ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त सुट्टी असणार आहे.

असा गोंधळ टाळण्यासाठी लोकांनी बीएसईच्या वेबसाइट - bseindia.com ला भेट देऊन वरील 'ट्रेडिंग हॉलिडेज' पर्यायावर क्लिक करावं, असा सल्ला देण्यात आला आहे. 'ट्रेडिंग हॉलिडेज' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर २०२४ मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिसेल. शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या या यादीमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये फक्त एक सुट्टी आहे जी महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आली होती. याशिवाय या महिन्यात सुट्टी नाही.

नोव्हेंबरमध्ये शेअर बाजाराच्या सुट्ट्या

शेअर बाजारात महात्मा गांधी जयंतीनंतर पुढील सुट्टी १ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. म्हणजेच उद्या भारतीय शेअर बाजार खुला राहणार आहे. दिवाळी २०२४ साठी भारतीय शेअर बाजाराची सुट्टी या आठवड्यात १ नोव्हेंबर २०२४ म्हणजेच शुक्रवारी आहे. करन्सी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग १ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद राहणार आहे. मात्र, या दिवशी एक तासाचा विशेष दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्समध्ये ट्रेडिंग सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. संध्याकाळी पाच वाजता पुन्हा व्यवहार सुरू होतील. याशिवाय १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु नानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

टॅग्स :शेअर बाजारदिवाळी 2024