Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

कर्मचाऱ्यांनाही कार देण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:48 PM2023-11-03T17:48:00+5:302023-11-03T17:49:14+5:30

कर्मचाऱ्यांनाही कार देण्यात आली आहे. 

Diwali bonus arrives, family rejoices; The owner gave the tata punch car to the employees of farma company | दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

चंडीगढ - दिवाळीचा सण अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी बोनस वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डबल पगार बोनस दिला जातो, तर काही कंपन्यांमध्ये महागड्या वस्तूही देण्यात येतात. यापूर्वी गुजरातमधील एका हिरा उत्पादक कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून तब्बल कार गिफ्ट देऊ केल्या होत्या. आता, एका फार्मासिटीकल कंपनीनेही कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क कार देऊ केल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनीतील शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांनाही कार देण्यात आली आहे. 

पंजाबमधील पंचकुला या औषध निर्माता कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून कार गिफ्ट केली. लवकरच आणखी ३८ कर्मचाऱ्यांनाही कार गिफ्ट दिली जाणार आहे. मिट्सकार्ट कंपनीचे मालक एमके भाटिया यांनी याबाबत बोलताना म्हटले की, मी कंपनीनत काम करताना ना मालक म्हणून काम करतो, ना कर्मचाऱ्यांना कर्मचारी समजतो. माझ्यासाठी कंपनीतल सर्वच कर्मचारी स्टार आहेत, ते सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. काही दिवसांपूर्वीच भाटिया यांनी कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, कार भेट देत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. त्यांच्या या दिलदारपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कंपनीने टाटा पंच ही कार कर्मचाऱ्यांना भेट दिली. 

कंपनीच्या मालकांनी यंदा थेट दिवाळीचं गिफ्ट म्हणून कार भेट दिल्याने कर्मचारी जाम खुश झाले आहेत. कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही खुश असून महिला कर्मचाऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे काही महिला कर्मचाऱ्यांना कार चालवताही येत नाही, त्यामुळे आधी कार चालवायला शिकावं लागेल, असेही त्यांनी म्हटलं. 

Web Title: Diwali bonus arrives, family rejoices; The owner gave the tata punch car to the employees of farma company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.