Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांच्या हॉटेलसंदर्भातील धोरणात बदल केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:03 AM2024-10-29T06:03:51+5:302024-10-29T06:04:08+5:30

प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांच्या हॉटेलसंदर्भातील धोरणात बदल केला आहे. 

Diwali celebration of Air India employees, increase in allowances | एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

मुंबई : विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया कंपनीने आपल्या धोरणांत बदल केला असून, यानुसार वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे. तसेच प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांच्या हॉटेलसंदर्भातील धोरणात बदल केला आहे. 

एअर इंडियाने आपल्या धोरणात बदल करत प्रवासादरम्यान केबिन कर्मचाऱ्यांना हॉटेलमधील रूम शेअर करण्यास लावली होती. मात्र, प्रवास करून थकल्यानंतर आपल्याला खासगी वेळेची गरज आहे. रूम शेअर केल्यास स्वतःचा वेळ मिळणार नसल्याचा पवित्रा घेत कर्मचाऱ्यांनी या धोरणाला विरोध केला होता. या विरोधाची दखल घेत आता कर्मचाऱ्यांचा विचार घेऊन नवीन धोरण निश्चित करण्यात आले आहे.

छोट्या प्रवासात कर्मचाऱ्यांना हॉटेलची रूम शेअर करावी लागणार आहे. मोठा प्रवास किंवा परदेशात प्रवास असेल तर कर्मचाऱ्यांना सिंगल रूम देण्यात येणार आहे. या खेरीज आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ७५ ते १०० अमेरिकी डॉलर असा भत्ता मिळत होता. त्यातदेखील वाढ करत भत्त्याची रक्कम ८५ ते १३५ अमेरिकी डॉलर अशी वाढवण्यात आली आहे.

Web Title: Diwali celebration of Air India employees, increase in allowances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.