नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत मोबाईलद्वारे होणाऱ्या ई-कॉमर्स व्यवहारात ७५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूसी वेब या कंपनीने केलेल्या अध्ययनात ही माहिती समोर आली.
यूसी वेब या कंपनीचे ‘यूसी ब्राऊजर’ हे मोबाईल ब्राऊजर प्र्रसिद्ध आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केनी ये यांनी सांगितले की, दिवाळीच्या एक महिना आधीपासूनच मोबाईल ई-कॉमर्समध्ये वाढ झाली होती. यूसी ब्राऊजरच्या माध्यमातून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडीलवर व्यवहार करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढली होती.
केनी ये यांनी म्हटले की, भारतीय नागरिक मोबाईलवरून खरेदी करण्याचा मार्ग वेगाने अनुसरताना दिसत आहेत.
दिवाळीत मोबाईल ई-कॉमर्स तब्बल ७५ टक्क्यांनी वाढले
यंदाच्या दिवाळीत मोबाईलद्वारे होणाऱ्या ई-कॉमर्स व्यवहारात ७५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूसी वेब या कंपनीने केलेल्या अध्ययनात ही माहिती समोर आली.
By admin | Published: November 23, 2015 09:53 PM2015-11-23T21:53:07+5:302015-11-23T21:53:07+5:30