अगदी दिवाळीतच ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. आज 1 नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने जारी केलेल्या ताज्या दरानुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आजपासून 1802 रुपये एवढी झाली आहे. याशिवाय, कोलकात्यात 19 किलो LPG गॅस सिलिंडरची किंमत 1911.50 रुपये तर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 1754.50 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा भाव 1964.50 रुपयांपर्यंत वाढला आहे.
मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ग्राहकांनाही 62 रुपयांचा झटका बसला आहे. 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये एवढी होती ती आता 1754.50 रुपये झाली आहे. तर, कोलकात्यात आधी 1850.50 रुपयांना मिळणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1911.50 रुपयांना झाला आहे. चेन्नईमध्ये 1903 रुपयांना मिळणारा हाच सिलिंडर आजपासून 1964.50 रुपयांना मिळेल.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही - महत्वाचे म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आज चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडर सप्टेंबर प्रमाणेच 818.50 रुपयांना मिळत आहे. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना, कोलकात्यात 829 रुपयांना तर मुंबईतही 802.50 रुपये या जिन्या दरानेच मिळत आहे.