Lokmat Money > बिझनेस न्यूज > डीमार्टच्या दमानींनी २.२२ लाख, SBI एमएफनं घेतले २.२५ लाख शेअर्स, शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

डीमार्टच्या दमानींनी २.२२ लाख, SBI एमएफनं घेतले २.२५ लाख शेअर्स, शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

शेअर बाजारातील दिग्गद गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी अलीकडेच एका कंपनीचे 2.22 लाख शेअर्स खरेदी केले आहेत/

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:40 AM2024-01-03T10:40:45+5:302024-01-03T10:43:32+5:30

शेअर बाजारातील दिग्गद गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी अलीकडेच एका कंपनीचे 2.22 लाख शेअर्स खरेदी केले आहेत/

Dmart radhakishan damani buys 2 22 lakh shares SBI MF buys 2 25 lakh shares vst industries shares huge profit stock market | डीमार्टच्या दमानींनी २.२२ लाख, SBI एमएफनं घेतले २.२५ लाख शेअर्स, शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

डीमार्टच्या दमानींनी २.२२ लाख, SBI एमएफनं घेतले २.२५ लाख शेअर्स, शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

शेअर बाजारातील दिग्गद गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी अलीकडेच एका कंपनीचे 2.22 लाख शेअर्स खरेदी केले आहेत, यासोबत SBI म्युच्युअल फंडानंही या कंपनीचे 2.25 लाख शेअर्स खरेदी केले. बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह सुरू झाला. तर  मंगळवारी शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 365 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं होतं. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधा किशन दमानी आणि SBI म्युच्युअल फंड यांनी एका तंबाखू कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
मंगळवारी व्हीएसटी इंडस्ट्रीज नावाचा हा शेअर 20 टक्क्यांनी वाढून 4065 रुपयांच्या पातळीवर पोहोचला, तर बुधवारी पुन्हा एकदा हा शेअर तीन टक्क्यांनी वाढून 116 रुपयांच्या वाढीसह 4176 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

6420 कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स कंपनीनं सुमारे 3390 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले आहेत. राधा किशन दमानी यांनी कंपनीत 75.57 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर एसबीआय म्युच्युअल फंडाने राधा किशन दमानी यांच्यासोबत व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 2.25 लाख शेअर्स 3390 रुपयांच्या पातळीवर खरेदी केले आहेत आणि त्यात त्यांनी 76.27 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

यांच्याकडून शेअर्सची विक्री
महत्त्वाचं म्हणजे त्याच दिवशी HDFC म्युच्युअल फंडानं व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 2 लाख शेअर्स 3390 रुपये किमतीत विकले. तर डीएसपी म्युच्युअल फंडानं 3390 रुपये प्रति शेअर या दरानं 2.5 लाख शेअर्स विकले आहेत. व्हीएसटी इंडस्ट्रीज ही एक आघाडीची सिगारेट उत्पादक कंपनी आहे ज्याचा बाजारातील हिस्सा 10 टक्के आहे. कंपनी सिगारेट निर्मिती आणि व्यापाराच्या व्यवसायात आहे. यासोबतच व्हीएसटी इंडस्ट्रीज तंबाखू आणि इतर संबंधित उत्पादनांच्या निर्मिती तसंच व्यापारातही गुंतलेली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Dmart radhakishan damani buys 2 22 lakh shares SBI MF buys 2 25 lakh shares vst industries shares huge profit stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.