नवी दिल्ली : रिटेल चेन डीमार्टचे मालक आणि प्रसिद्ध गुंतणूकदार राधाकिशन दमानी यांनी मोठी झेप घेतली आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या पहिल्या 100 लोकांच्या यादीत आले आहेत. सामान्य पार्श्वभूमी असलेल्या दमानी यांना ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये दमानी यांना 1920 कोटी डॉलरच्या संपत्तीसह 98 वे स्थान मिळाले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स जगातील श्रीमंतांचा दैनिक संपत्तीचा लेखाजोखा ठेवते. (DMart's Radhakishan Damani breaks into top 100 richest list in Bloomberg Billonaires Index.)
जगातील पहिल्या 100 हस्तींमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, अजीम प्रेमजी, पल्लोनजी मिस्त्री, शिव नादर, लक्ष्मी मित्तल यांची नावे आहेत. यात आता राधाकिशन दमानींचे नावदेखील आले आहे. दमानी हे मुंबईतील एका खोलीच्या घरामध्ये राहत होते. मुंबई विद्यापीठातून त्यानी शिक्षण घेतले आहे. मात्र, पहिल्या वर्षातच ड्रॉपआऊट झाले. त्यांचे वडील दलाल स्ट्रीटवर काम कराय़चे. त्यांच्या मृत्यूनंतर दमानी यांनी बॉल बेअरिंगचा व्य़वसाय बंद केला आणि ते स्टॉक मार्केट ब्रोकर आणि गुंतवणूकदार बनले.
शेअर बाजारात एन्ट्री1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा झाला. त्यावेळी कमी विक्री आणि फायद्यामुळे त्यांनी क्षेत्र बदलले. 2000 मध्ये त्यांनी हायपरमार्केट साखळी उभारण्यासाठी पहिले पाऊल टाकले. शेअर बाजाराला रामराम करत त्यांनी 2002 मध्ये पवईत पहिले DMart स्टोअर सुरु केले. 2010 मध्ये डीमार्टचे 10 स्टोअर उघडले गेले. यानंतर कंपनी वेगाने पुढे गेली आणि 2017 मध्ये सार्वजनिक झाली. दमानी कधीही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत, तसेच फार कमी मुलाखती देतात. 2020 मध्ये ते 1650 कोटी डॉलर संपत्तीसह भारतातील चौथे अब्जाधीश बनले. तेव्हा त्यांना जगातील श्रीमंतांच्या यादीत 117 वे स्थान मिळाले होते.