नवी दिल्ली : यंदाची धनतेरस सराफा व्यापाऱ्यांना लाभली नाही. ग्राहकांअभावी राजधानी दिल्लीत सोने ११0 रुपयांनी घसरून ३0,५९0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव ४२,७00 रुपये किलो असा स्थिर राहिला.बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील घसरणीचा फटका सोन्याला बसला. स्थानिक बाजारातील समर्थनामुळे चांदी जैसे थे स्थितीत राहू शकली. धनतेरसीच्या दिवशी सोने खरदी करणे उत्तर आणि पश्चिम भारतात शुभ समजले जाते. त्यामुळे या दिवशी नेहमीच खरेदीचा उत्साह दिसून येतो. या पार्श्वभूमीवर आज ज्वेलरांनी जोरदार खरेदी केली. तरीही सोने घसरलेजागतिक बाजारांपैकी प्रमुख असलेल्या सिंगापूर येथे सोने 0.१७ टक्क्यांनी घसरून १,२६५.९0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.३४ टक्क्यांनी घसरून १७.५३ डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ११0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,५९0 रुपये आणि ३0,४४0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,५00 रुपये प्रति नग असा स्थिर राहिला. वायदे बाजारात डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव ४६ रुपयांनी अथवा 0.१५ टक्क्यांनी घसरून २९,८८१ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ४२,७00 रुपये किलो असा स्थिर राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १५ रुपयांनी घसरून ४२,१७0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७५ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. गेल्या वर्षी धनतेरसनंतरच्या वर्षभराच्या काळात सोन्याचा भाव ४,३६0 रुपयांनी अथवा १६.६ टक्क्यांनी वाढला तसेच चांदीचा भाव ७,२९0 रुपयांनी अथवा २0.५८ टक्क्यांनी वाढला. (लोकमत न्यूज नेटवर्क)खरेदीचा आनंद... सोन्याची किंमत कितीही असो दागिना खरेदी करण्याचा मोह आवरणे कठीणच. आपल्या गळ्यात सोन्याचा दागिना हे महिलांसाठी भूषणच. यंदा खरेदीला प्रतिसाद कमी असला तरी जे ग्राहक सोने खरेदी करताहेत त्यांच्या आनंदाला पारावर नाही.
धनत्रयोदशीलाही खरेदी नाही; सोने घसरले
By admin | Published: October 29, 2016 2:47 AM