नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिलीट करणाऱ्या सर्व ग्राहकांची माहिती तसेच त्यांचा डेटा लगेचच काढून टाकण्यात यावा आणि आपल्या युजर्सची माहिती व्हॉट्सअॅपने फेसबुकशी फेसबुकसोबत शेअर करू नये, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय व्हॉट्सअॅपसारख्या मेसेजिंग अॅपला नियामक आराखड्यात आणणे शक्य आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्र सरकार आणि ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे केली आहे. व्हॉट्स अॅपने युजर्सची सर्व माहिती आणि डेटा त्याने अकाऊंट डिलीट करताच काढून टाकतो, असे स्पष्ट केल्याबद्दल न्यायालयाने समाधान व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>..तर बाहेर पडता येईल
फेसबुकने व्हॉट्स अॅपचा ताबा घेतल्यानंतर या अॅपने २५ आॅगस्ट रोजी आपल्या धोरणात बदल करून, आपरी माहिती फेसबुकला शेअर करण्याचा निर्णय करण्याचे प्रयत्न केले होते. त्यासाठी अर्थातच युजर्सना पर्याय दिला होता. हा पर्याय नको असल्यास ३0 दिवसांच्या आत म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत युजर्सना त्यातून बाहेर पडता येईल.
व्हॉट्सअॅपची माहिती फेसबुकला देऊ नका
व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिलीट करणाऱ्या सर्व ग्राहकांची माहिती तसेच त्यांचा डेटा लगेचच काढून टाकण्यात यावा
By admin | Published: September 24, 2016 03:54 AM2016-09-24T03:54:58+5:302016-09-24T05:35:13+5:30