नवी दिल्ली - वाढत्या महागाईमुळे नव्या व्यावसायिक आॅर्डस्मध्ये घट झाल्यामुळे फेब्रुवारीत भारतीय सेवा क्षेत्राचा संकोच झाला. एका खासगी सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. नोव्हेंबरनंतर या क्षेत्रात प्रथमच घसरण दिसून आली आहे.
निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अॅक्टिव्हिटी निर्देशांक ५१.७ अंकांंवरून ४७.८ अंकांवर घसरला आहे. हा आॅगस्टनंतरचा सर्वाधिक घसरण दर ठरला आहे. नोव्हेंबर २0१६मध्ये नोटाबंदी लावल्यानंतर मागील वर्षी सेवा क्षेत्र घसरणीला लागले होते. जीएसटीने या क्षेत्राला दुसरा झटका दिला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे क्षेत्र या धक्क्यांमधून सावरले.
अर्थतज्ज्ञ आश्ना दोधिया यांनी सांगितले की, नोव्हेंबरनंतर सेवा क्षेत्रात पहिल्यांदाच घसरण झाली आहे. घसरणीचा दर आॅगस्टनंतर सर्वाधिक मजबूत राहिला. अलीकडील काळात जी सुधारणा झाली होती, ती गमावली गेली आहे. सेवा अर्थव्यवस्थेतील कमजोर मागणी हे यामागील प्रमुख कारण आहे. या अहवालानुसार, महागाईमुळे सेवा क्षेत्रातील खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक सेवांमधील वाढीव खर्चाचा भार ग्राहकांवर टाकावा लागला आहे. इंधनाचे दर चढेच आहेत. आगामी वर्षात सरकारी खर्च वाढण्याचा
अंदाज आहे.
त्यामुळे महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्के
उद्दिष्टापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. परिणामी, आरबीआयकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीत वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रालाही महागाईचा फटका बसला आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राचा उत्पादन खर्च साडेतीन वर्षांत सर्वाधिक वेगाने वाढला आहे.
भरतीमध्ये वाढ
दोधिया यांनी सांगितले की, सेवा क्षेत्रातील घसरण तात्पुरती राहील, असे संस्थांना वाटते. त्यामुळे त्यांनी कर्मचाºयांची भरती वाढविली आहे. जून २0११ नंतर सर्वाधिक वेगाने भरती झाल्याचे दिसून येत आहे.
सेवा क्षेत्राचा संकोच, सर्वेक्षणातील माहिती
वाढत्या महागाईमुळे नव्या व्यावसायिक आॅर्डस्मध्ये घट झाल्यामुळे फेब्रुवारीत भारतीय सेवा क्षेत्राचा संकोच झाला. एका खासगी सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. नोव्हेंबरनंतर या क्षेत्रात प्रथमच घसरण दिसून आली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:16 AM2018-03-06T01:16:18+5:302018-03-06T01:16:18+5:30