नवी दिल्ली : अनिल अंबानी व त्यांच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना देशाबाहेर जाऊ देऊ नका, अशी विनंती एरिक्सन या मोबाइल कंपनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. अनिल अंबानी यांच्या आरकॉम या कंपनीने एरिक्सनचे ५५० कोटी देणे आहे. त्यासाठी एरिक्सनने आॅक्टोबरची मुदत दिली होती.
पण आरकॉमने ही रक्कमही परत केली नाही. त्यामुळे कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एरिक्सनच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापूर्वी देशातील मोठे उद्योजकबँकांचे कर्ज बुडवून फरार झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एरिक्सनने ही याचिका दाखल केल्याचे दिसून येते.