Join us

सध्याची गुंतवणुकीची संधी सोडू नका! अनेक चांगले शेअर्स कमी किमतीत उपलब्ध; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 9:05 AM

रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार भरपूर घसरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनी घेणे गरजेचे आहे. 

प्रसाद गो. जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क

रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार भरपूर घसरला असून, आगामी सप्ताहात तो अस्थिरच राहण्याची शक्यता आहे. अनेक चांगले शेअर्स आता कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असल्याने आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांनी घेणे गरजेचे आहे.  आगामी सप्ताहात युद्धाबाबत होणाऱ्या घडामोडी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ, वाहन विक्री, उत्पादकता तसेच सेवा क्षेत्राचा पीएमआय याबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीचा अभ्यास करूनच बाजार वर-खाली जाण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारात अस्थिरता कायम राहणार हे नक्की आहे.

भांडवल घटले

दरम्यान गतसप्ताहामध्ये पहिल्या दहा कंपन्यांचे भांडवल ३.३३ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. रिलायन्सला सर्वाधिक तोटा झाला असला तरी या कंपनीने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्या आहेत.

बाजार भांडवल सात महिन्यातील नीचांकी

- फेब्रुवारी महिन्यामध्ये शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली असल्यामुळे बाजारातील एकूण कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य खाली येऊन गेल्या सात महिन्यांमधील कमी झाले आहे. २५ फेब्रुवारी रोजी मुंबई शेअर बाजारातील एकूण कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २,४९,९७,०५३.३९ कोटी रुपये होते. 

- गतसप्ताहापेक्षा त्यामध्ये १०,५१,०६९.१७ कोटी रुपयांनी घट झाली आहे. याआधी जुलै, २०२१मध्ये बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २,३५,४९,७४८.९ कोटी रुपये होते. त्या पातळीच्या जवळ आता भांडवलमूल्य आले आहे.

निर्देशांक    बंद मूल्य    फरक

सेन्सेक्स    ५५,८५८.५२    (-)१९७४.४५निफ्टी       १६,६५८.४०    (-) ४१७.९०मिडकॅप    २३,१६२.५०    (-) ६०९.४५स्मॉलकॅप  २६,४५०.३८    (-) १२९७.९२ 

टॅग्स :शेअर बाजार