नवी दिल्ली : ट्रायच्या प्रमुखांनी आधार नंबर शेअर केल्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर आता यूआयडीएआयने नागरिकांना याबाबत काही सूचना केल्या आहेत. आधार नंबरबाबत काय करावे आणि काय करू नये याची माहिती यात देण्यात आली आहे. सोशल मीडियावर आधार नंबर शेअर करू नये, यासाठी लोकांना जागरुक करण्यात येणार असून त्यासाठी यूआयडीएआय योजना तयार करत आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (यूआयडीएआय) नागरिकांना आवाहन केले आहे की, पॅन, बँक अकाऊंट आणि क्रेडिट कार्ड व अन्य महत्त्वाच्या दस्तऐवजांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक, टिष्ट्वटर आदींवर देऊ नये.
यूआयडीएआयचे सीईओ अजयभूषण पांडे म्हणाले की, लोकांना याबाबत जागरूक करणे गरजेचे आहे.लोकांनी न घाबरता स्वतंत्रपणे आधारचा उपयोग करावा. याबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे दिली जातील.
सोशल मीडियावर आधारचा नंबर शेअर केला जावा काय? यावर यूआयडीएआयचे असे म्हणणे आहे की, आपल्या गोपनीय माहितीवर कोणी आक्रमण करू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडियावर आधार नंबर व अन्य माहिती शेअर करण्यात येऊ नये.
सोशल मीडियावर चर्चा
ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी मागील आठवड्यात आपला आधार नंबर टिष्ट्वट केल्यानंतर यावरून नवा वाद सुरू झाला होता. एका युजर्सने त्यांना थेट आव्हान देत या नंबरच्या आधारे आम्ही शर्मा यांच्या बँक अकाऊंट आणि ईमेलपर्यंत पोहोचू शकलो आहोत, असा दावा केला होता. अर्थात, शर्मा यांनी हे दावे फेटाळले होते. सोशल मीडियावर यावर चर्चा झडत असतानाच यूआयडीएआयने ३१ जुलै रोजी नागरिकांना आवाहन केले होते की, आपला आधार नंबर इंटरनेट आणि सोशल मीडियावर शेअर करू नका.
आपला आधार नंबर शेअर करू नका, यूआयडीएआयची सूचना
ट्रायच्या प्रमुखांनी आधार नंबर शेअर केल्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर आता यूआयडीएआयने नागरिकांना याबाबत काही सूचना केल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:50 AM2018-08-13T04:50:09+5:302018-08-13T04:50:27+5:30