Join us

एप्रिल महिन्यात असे करा पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 7:22 AM

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्याला आर्थिक नियोजन करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याची संधी देते. इमर्जन्सी फंड तयार करण्यापासून ते पुरेसे विमा कवच घेणे, गुंतवणुकीमध्ये सुधारणा करणे

मुंबई :

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्याला आर्थिक नियोजन करण्यासाठी नवीन योजना तयार करण्याची संधी देते. इमर्जन्सी फंड तयार करण्यापासून ते पुरेसे विमा कवच घेणे, गुंतवणुकीमध्ये सुधारणा करणे आणि कर नियोजन करणे, आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना तयार करण्याची आणि त्यावर वर्षभर काम करण्याची हीच योग्य वेळ असते. पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन नेमके कसे करावे याविषयी...

कठीण काळासाठी निधी जमवा- आर्थिक आणीबाणी कधीही बचतींमध्ये खोडा टाकण्यास भाग पाडू शकते. - आपत्कालीन निधी नसल्यास, स्वतंत्र निधी ठेवण्यासाठी तत्काळ सुरुवात करा. - कमीत कमी सहा महिन्यांच्या घरगुती खर्चाची पूर्तता करू शकणारा निधी जमा करून ठेवा. यासाठी आरडी काढू शकता.

विमा घेतला का?आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच, तुमच्याकडे आरोग्य विमा आणि जीवन विमा योजना आहेत का ते तपासा. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट इतके लाइफ कव्हरेज असावे.

गुंतवणूक योग्य परतावा देतेय का?विविध मालमत्ता, गुंतवणुकीतून आपल्याला परतावा मिळत असतो. आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच हा परतावा योग्य दिशेने आहे की नाही, हे तपासून पहा. समभाग, कर्ज, सोने आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायद्याची ठरतेय का, ते पाहून घ्या. परतावा नसेल तर थोडी वाट पाहून गुंतवणूक काढून घ्या.

कर नियोजन सुरू करा : तुमचे कर नियोजन करण्याची योग्य वेळ ही आर्थिक वर्षाची सुरुवात आहे. कुठे आणि कसा कर वाचू शकतो, याचा अभ्यास करा. कराचे योग्य नियोजन केले तर पैसा वाचेलच शिवाय त्याची भर तुमच्या बचतीतही पडेल.

आयटीआरची तयारी आताच करा  फॉर्म २६ एएस आणि एआयएस सारखी कागदपत्रे हाताशी ठेवल्याने आयटीआर लवकरात लवकर भरण्यास मदत होते. तुम्ही इतर कोणत्याही उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे नेहमी तयार ठेवावीत. उदाहरणार्थ, घरभाडे करार, भांडवली नफ्याचे विवरण, पावत्या, अकाउंट बुक्स, आदी जेव्हा तुम्ही कर-बचत गुंतवणूक करता तेव्हा पावत्यांचे रेकॉर्ड ठेवा. असे केल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही.

टॅग्स :व्यवसाय