Join us  

तुम्हालाही आहे का पैशांचा ‘हा’ आजार?; ‘मनी डिस्मॉर्फिया’आजार काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 6:12 AM

‘मनी डिस्मॉर्फिया’ हा आजार वाढू लागला आहे. 

नवी दिल्ली : ‘सोशल मीडिया’हे आता एक जणू व्यसन बनले आहे. तरुण-तरुणी यात आघाडीवर आहेत. फेबसुक, इन्स्टाग्रामवर लॉग इन करताच पाहायला मिळते की, कुणीतरी आलिशान गाडीत फिरत आहे, कुणी मोठ्या बंगल्यात राहत आहे, कुणी फॉरिन टुरवर गेले आहे... असे फोटो आणि पोस्ट लाईक करता-करता तरुणांनाही असे आयुष्य जगावेसे वाटू लागते. आपलेही जगणे असेच ग्लॅमरस करण्याच्या नादात तरुणांमध्ये ‘मनी डिस्मॉर्फिया’ हा आजार वाढू लागला आहे. 

‘मनी डिस्मॉर्फिया’आजार काय आहे? या अवस्थेत तरुणांना कशावर नेमका किती खर्च करावा, याचे भान राहत नाही. खर्चासाठी तरुण घाईघाईत चुकीचे निर्णय घेत जातात. नंतर एकामागून एक अशा पद्धतीने चुकीच्या निर्णयांचे दुष्टचक्र सुरू होते. यातून तरुणांवरील ताण वाढत जातो. 

ठरलेली नसतात आर्थिक उद्दिष्टे अनेक सर्व्हेंमधून असे दिसले आहे की, तरुणांना आपल्या आर्थिक स्थितीचे नेमके आकलन झालेले नसते. जवळपास निम्म्याहून अधिक तरुणांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे ठावुक नसतात, खर्च करताना ठरवलेल्या गोष्टींचे पालन करणे त्यांना जमत नव्हते. 

सोशल मीडियाचा अतिरेकnमिळकत निश्चित नसताना फेबसुक, इन्स्टाग्रामवर पाहिले आहे म्हणून तरुण-तरुणी महागड्या वस्तूंच्या नादी लागतात. nगरज नसताना ब्रँडेड घड्याळे, डिझायनर बॅगा, कपडे घेत सुटतात. सोशल मीडियामुळे आलेल्या प्रेशरमुळे ते बळी पडतात. nदिखाव्यासाठी हा खर्च करण्याआधी आपल्या खिशात नेमके किती पैसे आहेत, याचा विचार तरुण करीत नाहीत. 

‘लाऊड बजेटिंग’चा ट्रेंड

‘मनी डिस्मॉर्फिया’ होऊ नये म्हणून तरुणांमध्ये आर्थिक खर्चाविषयी चांगली समज निर्माण व्हावी म्हणून टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्म्सनी लाऊड बजेटिंगचा प्रचार सुरू केला आहे. यात तरुणांना दिखाव्यासाठी खर्च करणे टाळण्यास सांगितले जात आहे. याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एखादी गोष्ट खरेदी करताना ती गरजेची आहे का, हे तपासून घेण्यासाठी प्रेरित केले जात आहे. प्रत्यक्ष व्यवहार करण्याआधी खर्च करावयाची रक्कम कशी कमी करता येईल किंवा अर्ध्यावर आणण्यासाठी सांगितले जात आहे. 

टॅग्स :पैसासोशल मीडिया