आजकाल ऑनलाईनद्वारे खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोबाईल असेल की अन्य कोणते उत्पादन लोक त्याच्या खालील रिव्ह्यू वाचून, पाहून ती खरेदी करतात. अनेकदा तसे ते उत्पादन निघतही नाही, मग फसले जातात. फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई कॉमर्स साईटवर हे प्रकार सर्रास घडतात. अशा फसव्या रिव्ह्यूंवर आता केंद्र सरकारचा बुलडोझर चालणार आहे.
Amazon, flipkart वर रिव्ह्यू पाहून वस्तूंची खरेदी करता? सावधान, असे ओळखा फेक रिव्ह्यूज
ग्राहकांशी संबंधीत मंत्रालय आता या सबंधीचे नियम बदलणार आहे. यामुळे या खोट्या रिव्ह्यूंवर (Stop Fake Online Review) चाप बसणार आहे. या मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच ई कॉमर्स कंपन्यांसोबत बैठक केली होती. यामध्ये हा मुद्दा समोर आला होता. आता केंद्र सरकार अशी यंत्रणा बनविणार आहे, याद्वारे ऑनलाईन रिव्ह्यूंवर लक्ष ठेवले जाणार आहे.
विभाग सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या सध्याच्या यंत्रणेचा अभ्यास करत आहे आणि त्याच वेळी जागतिक स्तरावर पाळल्या जाणाऱ्या पद्धतींचा विचार करत आहे. त्यानंतरच विभाग फ्रेमवर्क तयार करेल. ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करताना, लोकांना एखाद्या उत्पादनाला स्पर्श करण्याची किंवा अनुभवण्याची संधी नसते. म्हणूनच प्रत्येकजण ऑनलाइन रिव्ह्यूंवर खूप विश्वास ठेवतो.
ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उत्पादनाचा रिव्ह्यू लिहिणाऱ्याची सत्यता आणि ई-कॉमर्स कंपन्यांची जबाबदारी सिद्ध करण्यासाठी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसेच, ई-कॉमर्स कंपन्यांनी हे रिव्ह्यू कोणत्या आधारावर निवडले, ते सांगावे लागणार आहे.