Join us

तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 9:08 AM

२००० रुपयांच्या नोटांचा वापर कमालीचा घटला, केवळ १.७५ टक्केच नाेटा वापरात

नवी दिल्ली : माेदी सरकारने पाच वर्षांपूर्वी नाेटबंदी जाहीर करून २००० रुपयांच्या नव्या चलनी नाेटा बाजारात आणल्या. मात्र, आता या नाेटा बाजारातून दिसेनाशा झाल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या २००० रुपयांच्या केवळ १.७५ टक्के नाेटाच चलनात आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून २००० रुपयांच्या नाेटांची छपाई झालेली नाही.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चाैधरी यांना राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की २६ नाेव्हेंबर २०२१ राेजी २००० रुपयांच्या २२३.३ काेटी नाेटा चलनात असल्याची नाेंद आहे. तर हा आकडा ३१ मार्च २०१८ राेजी ३३६.३ काेटी म्हणजेच एनआयसीच्या ३७.२६ टक्के एवढा हाेता. २०१८पासून छापखान्याकडे या नाेटांच्या छपाईसाठी काेणतीही आर्डर देण्यात आलेली नाही, असेही चाैधरी यांनी स्पष्ट केले. नाेटांच्या छपाईबाबत केंद्र सरकारकडून आरबीआयसाेबत चर्चा करण्यात येते. जनतेच्या व्यावहारिक मागणीनुसार ठराविक नाेटांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येताे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ८ नाेव्हेंबर २०१६ राेजी ५०० व १००० रुपयांच्या नाेटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर बाजारात तत्काळ २००० रुपयांची नाेटी आणली हाेती. त्यानंतर ५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नाेटाही बाजारात आणण्यात आल्या.

२०१८ पासून छपाई बंद२००० रुपयांच्या नाेटेची २०१८ पासून छपाई बंद असल्याने चलनातून या नाेटेचा वापर कमी झालेला दिसून येत आहे. याशिवाय नाेटा खराब हाेतात किंवा फाटतात. त्यामुळेही चलनातून त्यांचे प्रमाण कमी हाेते.

काेराेना काळात जनतेकडील राेख वाढलीकाेराेना काळातील अनिश्चितेत लाेकांनी माेठ्या प्रमाणात बॅंकांमधून पैसा काढला. या काळात राेख व्यवहार प्रचंड वाढले. तसेच अर्थव्यवस्थेत घट झाल्यामुळेही बाजारात राेख चलनाचे प्रमाण वाढले. २०२०-२१ या काेराेना काळातील आर्थिक वर्षात जनतेकडील चलनाचे प्रमाण १४.५ टक्क्यांनी वाढले. मात्र, नाेव्हेंबर २०२१ मध्ये त्यात माेठी घट झाली असून हे प्रमाण ७.९ टक्क्यांवर आले आहे , अशी माहितीही पंकज चाैधरी यांनी दिली.

टॅग्स :केंद्र सरकारभारतीय रिझर्व्ह बँक