Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमच्याकडेही HDFC चं क्रेडिट कार्ड आहे? १ जानेवारीपासून बदलणार हे नियम

तुमच्याकडेही HDFC चं क्रेडिट कार्ड आहे? १ जानेवारीपासून बदलणार हे नियम

HDFC Bank Credit Card: बँकेनं आपल्या ग्राहकांना ईमेल आणि एसएमएस वरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 06:11 PM2022-12-03T18:11:15+5:302022-12-03T18:11:21+5:30

HDFC Bank Credit Card: बँकेनं आपल्या ग्राहकांना ईमेल आणि एसएमएस वरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Do you have an HDFC credit card These rules will change from January 1 know details | तुमच्याकडेही HDFC चं क्रेडिट कार्ड आहे? १ जानेवारीपासून बदलणार हे नियम

तुमच्याकडेही HDFC चं क्रेडिट कार्ड आहे? १ जानेवारीपासून बदलणार हे नियम

तुम्हीही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना एसएमएस आणि ईमेल पाठवून माहिती दिली आहे की बँक क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट आणि फी स्ट्रक्चर बदलणार आहे. हे बदल 1 जानेवारी 2023 पासून होतील. बँकेने पाठवलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्डचा रिवॉर्ड पॉइंट प्रोग्राम आणि फी स्ट्रक्चर बदलण्यात येणार आहे.

एचडीएफसी बँकेने पाठवलेल्या मेसेजनुसार, बँकेच्या थर्ड पार्टी मर्चंटद्वारे रेंट भरल्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. नवीन वर्षापासून, बँकेने अशा पेमेंटसाठी व्यवहाराच्या एकूण रकमेवर 1 टक्के शुल्क आकारण्याची तयारी केली आहे. हे शुल्क दुसऱ्या महिन्याच्या रेंटच्या व्यवहारासह ग्राहकांकडून घेतले जाईल. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही परदेशात एखाद्या स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन तसंच भारतातील अशा ठिकाणीही भारतीय रुपयांमध्ये पेमेंट केले ज्याचा मर्चेंट परदेशात लिंक असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला 1 टक्के शुल्क आकारले जाईल. याशिवाय बँकेने क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट सिस्टममध्येही बदल केला आहे.

रिवॉर्ड पॉईंट सिस्टम बदलणार
नवीन वर्षापासून क्रेडिट कार्ड रिवॉर्ड सिस्टीममध्ये बदल करण्याचीही बँक तयारी करत आहे. वेगवेगळ्या कार्डांसाठी रिवॉर्ड सिस्टम वेगळी असेल. तुम्ही या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर रेंट भरण्यासाठी, फ्लाइट आणि हॉटेल्स सारखे बुकिंग करण्यासाठी किंवा व्हाउचर खरेदी करण्यासाठी करू शकता. रिवॉर्ड पॉइंट्सद्वारे ग्राहकांना प्रोत्साहित करत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर ते तुम्हाला अनेक बेनिफिट्सही देतात.

Web Title: Do you have an HDFC credit card These rules will change from January 1 know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.