सी. ए.उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कृष्णा ईदचा सण जवळ आला आहे. परंतु करदात्यांना या टीडीएस रिटर्नसाठी धावपळ करावी लागत आहे. सण व टीडीएसची ड्यू डेट एकामागोमाग आल्यामुळे करदात्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर आज हा टीडीएस काय प्रकार आहे, तो कोणाला लागू होतो व यासाठी काय करावे लागते, हे सविस्तरपणे समजावून सांग.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, बरोबर आहे. करदात्यांना ईदच्या तयारीसोबत टीडीएसची तयारी करावी लागणार आहे व त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स. टीडीएस म्हणजे समोरच्या व्यक्तीला मोबदला देताना त्यातून कपात केलेला कर. आयकर कायद्यानुसार व्यवहार करताना काही विशिष्ट व्यवहारांवर टीडीएसच्या तरतुदी लागू केलेल्या आहेत. कंपनी, पार्टनरशिप फर्म इ. करदात्यांना टीडीएसच्या तरतुदी लागू होतात. तसेच साधारणत: काही विशिष्ट टीडीएसच्या तरतुदी सोडून ज्या वैयक्तिक किंवा एचयूएफ करदात्यांना टॅक्स आॅडिट लागू होतो, त्यांना टीडीएसच्या तरतुदी लागू होतात.
अर्जुन : कृष्णा, टीडीएसची कपात के व्हा करावी व कशी करावी?
कृष्ण : अर्जुना, ज्या आर्थिक व्यवहारामध्ये टीडीएस लागू होतो त्या करदात्याला तो पुस्तकामध्ये दर्शविण्याची तारीख म्हणजेच बुकिंग किंवा पेमेंटची तारीख, जी आधी असेल त्यावर करकपात (टीडीएस) करावा लागतो. म्हणजेच जर अॅडव्हान्स दिला असेल व बिल बुक केले नसेल तर त्यावर टीडीएस करावा लागेल. आयकर कायद्यामध्ये व्यवहाराच्या प्रकार जसे प्रोफेशनल फिज, व्याज, भाडे, इ. वरून टीडीएसचे दर ठरवलेले आहेत, त्याप्रमाणे त्याची कपात करावी. तसेच सर्व्हिस टॅक्सवर करकपात करू नये. म्हणजेच जर १०० रु. बिल व त्यावर १४ रु. सर्व्हिस टॅक्स लागला असेल तर टीडीएस १०० रु. वरच करावा.
अर्जुन : कृष्णा, टीडीएससंदर्भात करदात्याला काय काय व कधी करावे लागते?
कृष्ण : अर्जुना, सर्वात आधी करदात्याला त्याचा टॅन नंबर ( टॅक्स डिडक्शन अॅण्ड कलेक्शन अकाउंट नंबर ) घ्यावा लागेल. ज्या महिन्यात टीडीएस कपात केली असेल तो महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यंत टीडीएसचे पेमेंट करावे लागते. मार्च महिन्याचा टीडीएस पमेंट करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुभा दिलेली आहे. तसेच क्वार्टरली रिटर्न क्वार्टर संपल्यानंतर पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत दाखल करावे लागते. तसेच आर्थिक वर्षाचा शेवटचा क्वार्टर म्हणजेच जानेवारी ते मार्चचे टीडीएसचे रिटर्न भरावयाची ड्यु डेट १५ मे असते. आता करदात्यांना एप्रिल ते जून या त्रैमासिकाचे टीडीएसचे रिटर्न भरावयाची ड्यू डेट १५ जुलै आहे. त्यामुळेच शेवटचे २-३ दिवस राहिल्यामुळे करदात्यांची धावपळ होत
आहे.
अर्जुन : कृष्णा, टीडीएस कपात करण्याचे व इतर नियम पाळले नाही तर काय होइल?
कृष्ण : अर्जुना, जर करत्याने टीडीएस केले नाही तर त्याला त्या खर्चाच्या ३० टक्क्यांपर्यंतची वजावट मिळणार नाही. उदा. जर करदात्याने एका व्यक्तीला प्रोफेशल फीज रु. १ लाख दिली व टीडीएस के ले नाही तर त्याला रु. ३० हजारांची खर्चाची वजावट मिळणार नाही. तसेच टीडीएस कपात केली व ड्यू डेटपेक्षा उशिरा भरला तर व्याज व पेनल्टी लागते. तसेच त्रैमासिक टीडीएसचे रिटर्न उशिरा दाखल केल्यास रु. २०० प्रतिदिवसप्रमाणे लेट फीज आकारली जाते. म्हणजेच करदात्याला कायद्याच्या तरतुदीचे पालन करूनच ईद साजरी करावी लागेल नाहीतर विनाकारण लेट फीज भरावी लागेल. तसेच आयकर कायद्याच्या कलम २०१ अनुसार करदात्याला काही विशिष्ट व्यवहारामध्ये जर समोरच्या व्यक्तीने व्यवहारातील उत्पन्नावर कर भरून रिटर्न दाखल केल्याचे सीए सर्टिफिकेट आणले तर टीडीएसपासून सुटका मिळू शकते.
अर्जुन : कृष्णा, टीडीएस लागू होणारे महत्त्वाचे व्यवहार कोणते?
कृष्ण : अर्जुना, टीडीएस लागू होणारे महत्त्वाचे व्यवहार पुढीलप्रमाणे आहेत -
१) पगार : जर एम्प्लॉयीचा पगार करपात्र असेल तर एम्प्लॉयरला दर महिन्याला टीडीएस करावा लागले.
२) प्रोफेशनल फीज : जर प्रोफेशनल सर्व्हिस रु. ३०,००० च्यावर असेल तर प्रोफेशनल फीजवर १० टक्के टीडीएस करावा लागतो.
३)कॉन्ट्रॅक्टर : जर कॉन्ट्रक्ट दिला असेल व त्याचे एक संयुक्त बिल रु. ३०,००० च्या वर किंवा वर्षातील सर्व बिल मिळून रु. ७५,००० च्या वर जात असेल तर वैयक्तिक किंवा एचयूएफ करदात्यांना १ टक्का व इतर करदाता असेल तर २ टक्के टीडीएस करावा लागेल.
४) ट्रान्सपोर्टर : यावर्षी अर्थसंकल्पात झालेल्या बदलानुसार जर ट्रान्सपोर्टरकडे १० पेक्षा जास्त गाड्या असतील व ट्रान्सपोटेशन चार्जेसचे एक संयुक्त बिल रु. ३०,००० च्या वर किंवा वर्षातील सर्व बिल मिळून रु. ७५,००० च्या वर जात असेल तर वैयक्तिक किंवा एचयूएफ करदात्यांना १ टक्का व इतर करदाता असेल तर २ टक्के टीडीएस करावा लागेल. तसेच ट्रान्सपोर्टरकडे १० पेक्षा कमी गाड्या असतील तर पॅन नंबर नमूद करावा लागेल.
५) भाई : जर वार्षिक लँड किंवा बिल्डिंगचे भाडे रु. १८०, ००० च्या वर असेल तर १० टक्के टीडीएस करावा लागतो.
६) व्याज किंवा कमिशन : जर कोणत्याही व्यक्तीला वार्षिक रु. ५,००० च्या वर व्याज किंवा कमिशन दिले जात असेल तर त्यावर १० टक्के टीडीएस करावा लागेल.
७) अचल संपत्तीचे व्यवहार : जर अचल संपत्ती रु. ५० लाखांपेक्षा जास्तीची खरेदी केल्यास १ टक्का टीडीएस करावा लागेल.
भाईजान टीडीएस से कर लो पहचान
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कृष्णा ईदचा सण जवळ आला आहे. परंतु करदात्यांना या टीडीएस रिटर्नसाठी धावपळ करावी लागत आहे. सण व टीडीएसची ड्यू डेट एकामागोमाग
By admin | Published: July 13, 2015 12:14 AM2015-07-13T00:14:24+5:302015-07-13T00:14:24+5:30