Join us

अबब! लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानी एका मिनिटाला किती कमवतात माहित्येय? PM चा पगारही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 1:34 PM

Mukesh Ambani income: कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली. ज्यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, शिव नादर, सायरस पूनावाला, उदय कोटक, लक्ष्मी मित्तल सारख्या बड्या नावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमुकेश अंबानी यांच्याकडे कामाला असणाऱ्या काही नोकरांची मुले अमेरिकेसारख्या देशांमध्ये शिक्षण घेत आहेतअँटेलियाच्या देखभालीसाठी ६०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. यात वॉचमेनपासून ड्रायव्हर आणि कुकचाही समावेश आहे.मुकेश अंबानी हे मुंबईत २७ मजली अँटेलिया निवासस्थानी राहतात. या घराची किंमत ११ कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रिजचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्झरी लाईफबद्दल अनेकांना उत्सुकता असते. मुकेश अंबानी हे आशियाई देशात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कुटुंब उद्ध्वस्त झाली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुकेश अंबानी या काळातही कोट्यवधींची कमाई करत आहेत.

देशव्यापी लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानी प्रत्येक तासाला ९० कोटींची कमाई करत आहेत. ही माहिती Hurun India Rich List 2020 मध्ये देण्यात आली आहे. जर याचा प्रतिमिनिट विचार केला तर ते मिनिटाला तब्बल दीड कोटी कमवतात. मुकेश अंबानी हे मुंबईत २७ मजली अँटेलिया निवासस्थानी राहतात. या घराची किंमत ११ कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. अंबानी यांचे अलिशान घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. अँटेलियाच्या देखभालीसाठी ६०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. यात वॉचमेनपासून ड्रायव्हर आणि कुकचाही समावेश आहे.

Livemirror.com नुसार मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्या काम करणाऱ्या प्रत्येक स्टाफचा पगार २ लाख रुपये प्रति महिना इतका आहे. त्यात कामाच्या स्वरुपानुसार रक्कम बदलते. त्याशिवाय अंबानी यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण आणि विमा सॅलरीतून दिला जातो. मुकेश अंबानी यांच्याकडे कामाला असणाऱ्या काही नोकरांची मुले अमेरिकेसारख्या देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. अंबानी कुटुंब त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कुटुंब मानतं.   

देशातील श्रीमंतांची वाढली संपत्ती

रिपोर्टनुसार, कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली. ज्यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, शिव नादर, सायरस पूनावाला, उदय कोटक, लक्ष्मी मित्तल सारख्या बड्या नावांचा समावेश आहे. एप्रिल २०२० मध्ये प्रत्येक तासाला दीड लाख बेरोजगार झाले तर या लोकांची संपत्ती मिनिटामिनिटाला वाढत गेली. ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, देशातील २४ टक्के लोक प्रति महिना ३ हजार रुपये कमाई करतात.

टॅग्स :मुकेश अंबानीकोरोना वायरस बातम्या