Mahendra Singh Dhoni Daughter School: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्यात. यात टी-२० विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्याच्या कर्तृत्वामुळे जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याचबरोबर त्याची मुलगी झिवाचेही (Ziva) खूप चाहते आहेत. ती फक्त १० वर्षांची आहे आणि सोशल मीडियावर तिचा दबदबा आहे. ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेची वार्षिक फी लाखो रुपयांत आहे.
झिवाचा जन्म ६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. सोशल मीडियावर ती आधीच खूप प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे क्यूट फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. धोनीच्या चाहत्यांमध्ये झिवाचीही क्रेझ आहे.
भारतात कुठून आणि कशी झाली कॉफीची सुरुवात? आनंद महिंद्रांनी शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या
कोणत्या शाळेत शिकते झिवा?
झिवा रांचीच्या टॉरियन वर्ल्ड स्कूलमध्ये (Taurian World School) शिकते. ही शाळा धोनीच्या मूळ गावी आहे. २००८ मध्ये अमित बाजला यांनी या शाळेची स्थापना केली. अमित बाजला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहे. या शाळेत अनेक आधुनिक सुविधा आहेत. अमित बाजला सध्या शाळेचे अध्यक्ष आहेत.
अनेक प्रकारच्या अॅक्टिव्हीटी
टॉरियन वर्ल्ड स्कूल ६५ एकरमध्ये पसरलेली आहे. ही शाळा मुलांना अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. अभ्यासाबरोबरच मुलांना ऑर्गेनिक शेती आणि घोडेस्वारीही शिकवली जाते. याशिवाय या शाळेतील मुलं खेळ, कला, संगीत अशा उपक्रमांमध्येही सहभागी होतात. एज्युकेशन टुडे मासिकानुसार ही शाळा रांची आणि झारखंडमधील नंबर वन बोर्डिंग स्कूल आहे.
सोशल मीडियावर अनेक फोटो
झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. ती कधी पाळीव प्राण्यासोबत तर कधी आई-वडिलांसोबत दिसते. अनेक व्हिडीओंमध्ये ती मस्ती करतानाही दिसते. याशिवाय खास प्रसंगांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. झिवाला प्राण्यांची खूप आवड आहे.
किती आहे शाळेची फी?
टॉरियन वर्ल्ड स्कूलमध्ये एलकेजी ते बारावीपर्यंत शिकवलं जातं. प्रत्येक वर्गाची फी वेगवेगळी आहे. एलकेजी ते इयत्ता आठवीपर्यंतची फी वार्षिक सुमारे ४.७० लाख रुपये आहे. तर इयत्ता नववी ते बारावीची वार्षिक फी सुमारे ५ लाख १० हजार रुपये आहे. यामध्ये गणवेश, पुस्तकं आणि इतर अभ्यासवस्तूंचा समावेश आहे. झिवा फक्त १० वर्षांची असल्यानं ती चौथी किंवा पाचवीत असेल. त्यामुळे त्यांची वार्षिक फी सुमारे ४.७० लाख रुपये असेल.