Join us

Airtel चे प्रमुख सुनिल मित्तल यांची सॅलरी किती आह माहितीये? इनक्रिमेंटही आहे कोट्यवधींमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 4:39 PM

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांच्या वार्षिक वेतनात प्रचंड वाढ झाली आहे. पाहा किती आहे त्यांचं सध्याचं वेतन.

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे (Airtel) चेअरमन सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांच्या वार्षिक वेतनात प्रचंड वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांचा पगार ९२ टक्क्यांनी वाढून ३२.२७ कोटी रुपये झाला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात तो १६.७२ कोटी रुपये होता. ही वाढ १५.५० कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुनील भारती मित्तल यांचं वेतन आणि भत्ते २१.५ कोटी रुपये होते. यामध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव (पीएलआय) म्हणून ७.५ कोटी रुपये आणि अतिरिक्त भत्ते म्हणून ३.१ कोटी रुपये देण्यात आले. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात मित्तल यांचं वेतन आणि भत्ते १० कोटी रुपये होते. यामध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव म्हणून ४.५ कोटी रुपये आणि परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणून २.२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

एअरटेलमध्ये कोणाचा हिस्सा आहे?

जून २०२४ पर्यंत भारती एअरटेलमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ५३.१७ टक्के होता. तर पब्लिक होल्डिंग ४६.७७ टक्के आहे. बीएसई अॅनालिटिक्सनुसार, एअरटेलचे मार्केटकॅप ८.५० लाख कोटी रुपये आहे. हा बीएसई सेन्सेक्सचा भाग आहे. कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू ५ रुपये आहे.

देशातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक

सुनील भारती मित्तल हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. ते प्रामुख्याने दूरसंचार क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी भारती एअरटेलची स्थापना केली, ज्याचं आज भारतात आणि जगातील अनेक भागांमध्ये सर्वात मोठे दूरसंचार नेटवर्क आहे. कंपनी मोबाइल सेवांव्यतिरिक्त ब्रॉडबँड, डिजिटल टीव्ही आणि इतर दूरसंचार सेवा देखील पुरवते. भारताव्यतिरिक्त आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्येही एअरटेलची सेवा आहे. 

टॅग्स :एअरटेलसुनील भारती मित्तल