लांब पल्ल्याच्या प्रवासासीठी रेल्वे आरामदायी मानली जाते. भारतीय रेल्वे प्रवाशांना डोळ्यासमोर ठेऊन, त्यांच्या सुविधेसाठी आवश्यकतेनुसार नियमांमध्येही काही बदल करत असते. रेल्वेने लाखो लोक प्रवास करत असाता, मात्र अनेकदा त्यांना रेल्वेने तयार केलेले नियम माहीत नसल्याने अडचणींचा सामना करतावा लागतो. आज आम्ही आपल्याला रेल्वेशी संबंधित अशाच एका नियमासंदर्भात सांगणार आहोत. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.
2 स्टॉपपर्यंत सीट सुरक्षित -
अनेक वेळा लोकांना रेल्वे स्थानकावर पोहोचायला उशीर होतो आणि त्यांची रेल्वे सुटते. मात्र असा स्थितीत आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. कारण रेल्वे आपल्याला आपल्या बोर्डिंग स्टेशनपासून पुढील 2 स्टॉपपर्यंत ट्रेन पकडण्यची संधी देते. या दोन स्टॉपपर्यंत आपले सीट टीटीई कुणालीह अॅलॉट करत नाही.
जाणून घ्या, रूट ब्रेक जर्नी रूल? -
अधिकांश प्रवाशांना रेल्वेच्या या खास नियमांसंदर्भात माहिती नाही. मात्र रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक अशी सुविधा दिली आहे. यामुळे दूर पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. रेल्वेच्या नियमानुसार, जर आपण 500 किमीहून अधिकचा प्रवास करत असाल, तर आपण मधे एक ब्रेक घेऊ शकता.
याशिवाय आपला प्रवास याहून अधिक, म्हणजेच 1000 किलोमिटर असेल तर आपण आपल्या मार्गावर दोन ब्रेक घेऊ शकता. या सुविधेनुसार, आपण बोर्डिंग आणि डिसबार्किंगच्या तारखेशिवाय, 2 दिवसांचा ब्रेक घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, हा नियम शताब्दी, जनशताब्दी आणि राजधानी सारख्या ट्रेनला लागू नाही.