Apple iPhone : अॅपल आयफोन संपूर्ण जगातील सर्वात आवडत्या स्मार्टफोनपैकी एक आहे. आयफोन हा संपूर्ण जगात सर्वाधिक आवडता तर आहेच, शिवाय तो सर्वाधिक खरेदीही केला जातो. होय, अॅपल आयफोन हा जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. २००७ मध्ये अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ यांनी कंपनीचा पहिला स्मार्टफोन आयफोन ३जी सादर केला आणि या वर्षी कंपनी आयफोनची लेटेस्ट १७ सीरिज लाँच करू शकते. आयफोनव्यतिरिक्त अॅपल आयपॅड, मॅक, मॅक बुक, वॉच, इयरपॉड्स अशा अनेक उत्पादनांची विक्री करते.
अनेकांना i चा अर्थच माहीत नाही
आज जगभरात कोट्यवधी लोक अॅपलची उत्पादनं, विशेषत: आयफोन वापरत आहेत. जे आयफोन वापरत नाहीत त्यांनाही आयफोनबद्दल बरीच माहिती असते. पण iPhone मध्ये i चा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहितीये का? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तर त्यात नवल नाही, कारण आयफोनच्या बहुतांश युजर्सना आयफोनमधला i चा अर्थ माहित नसेल.
स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितलेला अर्थ
१९९८ मध्ये iMacची घोषणा करताना कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी i चा अर्थ समजावून सांगितला. समजा सुरुवातीच्या काळात आयमॅक, आयफोन, आयपॉड अशा अॅपलच्या उत्पादनांची नावं 'आय'पासून सुरू झाली. आयमॅकची घोषणा करताना स्टीव्ह जॉब्स यांनी 'i' म्हणजे इंटरनेट असल्याचं सांगितलं. अॅपलच्या उत्पादनांच्या नावातील 'i' म्हणजे इंटरनेट, इंडिव्हिज्युअल, इन्स्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन आणि इन्स्पायर असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
२००८ मध्ये अॅपलने आयफोनची विक्री सुरू केली तेव्हा जगभरात एकूण ११.६ दशलक्ष मिलियन ३जी युनिट्सची विक्री झाली होती. २०२४ मध्ये कंपनीनं एकूण २३१.३ मिलियन युनिट्सची विक्री केली. तर, २०२१ मध्ये कंपनीने सर्वाधिक २४२ मिलियन आयफोनची विक्री केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०२४ मध्ये जगभरात एकूण १४०४ मिलियन आयफोन अॅक्टिव्ह होते.