संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा हे दोघंही प्रसिद्ध अभिनेते आहेत. दोघांनी अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत. या दिग्गज कलाकारांनी मद्याच्या व्यवसायाच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. संजय दत्त हा स्कॉच ब्रँड 'द ग्लेनवॉक'चा ब्रँड पार्टनर आणि को-ओनर आहे. ही कंपनी कार्टेल ब्रदर्सच्या मालकीची आहे. ही एक प्रीमियम व्हिस्की कंपनी आहे. मोक्ष सानी, जितिन मेरानी, रोहन निहलानी, मनीष सानी आणि नीरज सिंग यांनी याची सुरुवात केली. त्याचवेळी डॅनी यांचा मद्याचा व्यवसाय युक्सम ब्रुअरीजच्या बॅनरखाली पसरला आहे. हे दोघेही सध्या चर्चेत आले आहेत.
महाराष्ट्रात नव्या लाँचची घोषणा
संजय दत्तच्या स्कॉच व्हिस्की ब्रँडनं महाराष्ट्रात ५०० रुपयांना २०० मिलीची नवीन बाटली लाँच करण्याची घोषणा केली आहे. या क्षेत्रातील विक्री चौपटीनं वाढवण्याची ब्रँडची योजना आहे. २०२४ आयडब्ल्यूएस अवॉर्डमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर या परवडणाऱ्या बॉटलमुळे ब्रँडकडे असलेल्या ग्राहकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. ग्लेनवॉकला आशा आहे की लहान आणि स्वस्त बाटल्या अधिक लोकांना ब्रँड वापरण्यास प्रोत्साहित करतील. महाराष्ट्रातील मद्य व्यवसायात आपली पकड मजबूत करण्यासाठी ग्लेनहॉकनं ही रणनीती अवलंबली आहे.
डॅनी यांचा बिअर ब्रँड
त्याचबरोबर डॅनी यांचा बिअर ब्रँडही वेगानं लोकप्रिय होत आहेत. त्यांची निर्मिती युक्सोम ब्रुअरीजने केली आहे. युक्सम ब्रुअरीज ११ वेगवेगळ्या ब्रँडची बिअर बनवते. यामध्ये डॅन्सबर्ग डाएट, डेन्झोंग ९०००, झुम, हिमालयन ब्लू, इंडिया स्पेशल, डॅन्सबर्ग १६०००, हेमन ९०००, येती, डॅन्सबर्ग रेड, हिट आणि इंडिया स्पेशल बिअरचा समावेश आहे. यांनी भारतीय बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केले आहे.
युक्सोम ब्रुअरीजचे साम्राज्य किती मोठं?
युक्सोम ब्रुअरीज दरवर्षी तीन दशलक्षाहून अधिक बिअर केसेस तयार करते. हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड आहे. युक्सोम ब्रुअरीज सिक्कीममध्ये स्थित आहे. याचं कामकाज डॅनी आणि त्यांचे कुटुंबीय सांभाळतात. यामुळे कंपनीची वाढ होत आहे. युक्सोम ब्रुअरीज ओडिशा आणि आसाममध्ये राइनो ब्रुअरीज चालवते. ईशान्य भारतात या ब्रँडअंतर्गत उत्पादित बिअर खूप लोकप्रिय आहे.