Join us

LIC policy : एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना; आजच 'हे' काम उरकून घ्या, अन्यथा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 3:21 PM

PAN link with LIC policy : सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दरम्यान, पॉलिसीसोबत पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे (PAN link with LIC policy). सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. मार्केट रेगुलेटर सेबीनेही असाच नियम बनवला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे एलआयसीलाही पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

जर तुम्ही अद्याप पॉलिसी पॅनशी लिंक केली नसेल, तर तुम्ही ते घरी बसून ऑनलाइन करू शकता. जाणून घेऊया, याबाबतच्या स्टेप्स...1. एलआयसीच्या साइटवर पॉलिसीच्या लिस्टसह पॅन कार्डची माहिती द्या.2. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या मोबाईल नंबरवर एलआयसीकडून एक ओटीपी येईल, हा ओटीपी टाका.3. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट झाल्याचा मेसेज मिळेल.4. आता तुम्हाला समजेल की तुमचा पॅन पॉलिसीशी लिंक झाला आहे.

घर बसल्या चेक करा पॉलिसीचे स्टेटस>> एलआयसी पॉलिसीचे ऑनलाइन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ वर जावे लागेल. येथे स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.>> रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्टेटस कधीही तपासू शकता.>> तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 022 6827 6827 वर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP लिहून मेसेज देखील पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवल्यास तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

SMS द्वारे माहिती कशी मिळवायची?>> तुम्ही मोबाईलवरून एसएमएस पाठवून पॉलिसीच्या स्टेटसची माहिती देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.>> जर तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही ASKLIC PREMIUM टाइप करून 56677 क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता.>> पॉलिसी लॅप्स झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला ASKLIC REVIVAL टाइप करून एसएमएस करावा लागेल

टॅग्स :एलआयसीपॅन कार्ड