Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाइन भाड्याचे घर शोधताना तुम्ही 'ही' चूक करता का? मग तुमचे पैसे गेलेच समजा

ऑनलाइन भाड्याचे घर शोधताना तुम्ही 'ही' चूक करता का? मग तुमचे पैसे गेलेच समजा

Search Rental Home Online : भाड्याचे घरं घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सर्च करता का? याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:02 AM2024-09-12T10:02:35+5:302024-09-12T10:09:41+5:30

Search Rental Home Online : भाड्याचे घरं घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सर्च करता का? याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे.

Do You Search Rental Home Online Effective Ways to Prevent Frauds | ऑनलाइन भाड्याचे घर शोधताना तुम्ही 'ही' चूक करता का? मग तुमचे पैसे गेलेच समजा

ऑनलाइन भाड्याचे घर शोधताना तुम्ही 'ही' चूक करता का? मग तुमचे पैसे गेलेच समजा

Search Rental Home Online : शिक्षण, नोकरी, रोजगार अशा विविध कारणांसाठी शहरात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत कुठल्याही शहरात राहण्यायोग्य भाड्याने घर शोधणे हे मोठं आव्हान असतं. शिक्षण, काम सांभाळून रोज दारोदार चौकशी करत फिरावं लागतं. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात ब्रोकर्सने घुमाकूळ घातला आहे. घरमालकही आता चौकशीची कटकट टाळण्यासाठी ब्रोकर्सशिवाय घर देत नाहीत. मात्र, ब्रोकर्सची फी प्रत्येकाच्या खिशाला परवडेलचं असं नाही. अशात मग पर्याय उरतो तो ऑनलाईन घर शोधण्याचा. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एप्स नो ब्रोकरेज किंवा कमी पैशात घर शोधण्यास मदत करतात. याला पसंतीही चांगली मिळत आहे. तुम्हीही हा पर्याय वापरण्याचा विचार करत असाल तर सावधान. कारण, तुमच्यासोबत मोठा फ्रॉड होऊ शकतो. भाडेकरुनच नाही तर घरमालकही याला बळी पडत आहेत.

भाड्याने घर देण्याघेण्यात कशी होते फसवणूक
आजकाल ऑनलाईन भाड्याने घर शोधण्याचे प्रमाण वेगाने वाढलं आहे. घरमालकही आता विविध प्लॅटफॉर्मवर आपल्या घराची जाहिरात टाकत असतात. याच संधीचा गैरफायदा घेत काहीजण तुमची फसवणूक करू शकतात. अशा प्लॅटफॉर्मवर बनावट भाड्याच्या जाहिराती टाकल्या जातात. ही जाहिरात खरी वाटावी यासाठी अशाच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरुन घराचे फोटोही अपलोड केले जातात. सोबत आकर्षक ऑफर्सचेही आमिष असतेच. फायदा दिसत असल्याने घर शोधणारे लगेच अप्लाय किंवा फोन करतात. हे लोक एजंट असल्याचे भासवून तुमची वैयक्तिक माहिती चोरतात. या माहितीच्या आधारे तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.

तुम्हाला अशा फवणुकीला बळी पडायचं नसेल तर फसवणूक करणाऱ्यांची स्ट्रॅटेजी समजून घेणे आवश्यक आहे.

प्रत्यक्ष भेटीशिवाय कुठलही डील नको : प्रॉपर्टी मालक तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यास किंवा घर दाखवण्यास टाळाटाळ करत असेल तर हा रेड सिग्नल समजा. कोणताही करार करण्याआधी मालकाला प्रत्यक्ष भेटण्याचा आणि प्रॉपर्टी पाहून खात्री करण्याचा आग्रह धरा.

घरमालक शिफ्ट होण्यासाठी घाई करत असेल तर सावध व्हा : जर घरमालक किंवा भाडेकरू प्रॉपर्टी न पाहताच शिफ्ट होण्यासाठी घाई करत तर सावध रहा. ही ट्रीक अनेकदा तपासणी टाळण्यासाठी वापरली जाते.

घरमालक किंवा भाडेकरू यांची पूर्ण तपासणी करा : भाडे करार करण्यापूर्वी, घरमालक किंवा भाडेकरूची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वाहनचालक परवाना यासारख्या वैध ओळखपत्रांची मागणी करा. संबंधित प्रॉपर्टीचा खरा मालक कोण याची खात्री करण्यासाठी मालमत्तेची कागदपत्रे किंवा भाडे करार यांसारख्या मालकीच्या कागदपत्रांची पडताळणी करा. कोणताही नवीन भाडेकरू ठेवताना मागच्या घरमालकाकडून त्याचा पूर्वइतिहास माहीत करुन घ्या.

कधीही ओटीपी किंवा पिन शेअर करू नका : घरमालक आणि भाडेकरू दोघांनीही कधीही ओटीपी किंवा पिन शेअर करू नये. कायदेशीर भाडे व्यवहारांना अशी संवेदनशील माहिती शेअर करण्याची आवश्यकता नसते. हे कोड बँक खाती आणि वैयक्तिक डेटामध्ये एक्सेस देतात. 

एडवान्स पेमेंट टाळा : प्रॉपर्टी तपासण्यापूर्वी किंवा भाडे करारावर सही करण्याआधी कुठल्याही प्रकारचे पेमेंट घरमालक किंवा एजंट्सला करू नका. कायदेशीर प्रॉपर्टीमालक कधीही असे करत नाही.

भाडेकरूची पेमेंट पद्धत तपासून घ्या : फसवणूक टाळण्यासाठी घरमालकांनी भाडेकरूची पेमेंट पद्धतींची सत्यता पडताळली पाहिजे. भाड्याच्या ठेवी आणि मासिक पेमेंटसाठी बँक ट्रान्सफर यासारख्या सुरक्षित पेमेंट पद्धतीचा आग्रह धरा. भाडेकरूंनी दिलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करुन पैसे घेण्यास नकार द्या. 

कुठल्याही अवास्तव डीलपासून दूर रहा : कुठल्याही आकर्षक भाड्याच्या जाहिरातीपासून दूर रहा. प्रत्यक्ष खातरजमा केल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नका. जर तुम्हाला शंका आली तर संबंधित क्षेत्रातील इतर प्रॉपर्टीच्या किमतीही पाहा. एखादा फारच कमी किमतीत देत असेल तर नक्कीच काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता आहे.

QR कोड स्कॅमसह कुठल्याही फ्रॉडसाठी सावध रहा : बनावट एजंट, आगाऊ शुल्क फसवणूक, पेमेंटसाठी फिशिंग प्रयत्न आणि QR कोड स्कॅम यांसारख्या सामान्य भाडे घोटाळ्यांबद्दल सावध रहा. स्कॅमर तुम्हाला जाळण्यात ओढण्यासाठी रेंटल लिस्ट किंवा QR कोडचा वापर करू शकतात.

अनोळखी वेबसाइट्सना भेट देणे टाळा : कुठल्याही वेबसाइटवर प्रवेश करण्याआधी त्याची सत्यता तपासा. बनावट वेबसाईट बनवून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो.

मालवेअर डाउनलोड करणे : मालवेअर सॉफ्टवेअर QR कोडमध्ये लपवले जाऊ शकते. असा कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा एक्सेस दुसऱ्याकडे जाऊ शकतो. तुमची वैयक्तिक माहिती, बँकिंग क्रेडेन्शियल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो.
 

Web Title: Do You Search Rental Home Online Effective Ways to Prevent Frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.