Join us

येथे आहे पैसा, तुम्हाला हवाय का? मग या शहरात आहे मोठी संधी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 8:00 AM

स्टार्टअप साठी केवळ अनोख्या संकल्पनाच नव्हे तर पोषक वातावरणही आवश्यक

नवा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुमच्याकडे केवळ अनोख्या संकल्पना असून चालत नाहीत, तर त्यासाठी पोषक वातावरणही आवश्यक असते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ यासह तुमच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळाल्यास तुमचा स्टार्टअप यशस्वी ठरू शकतो. त्यानुसार जगातील कोणते शहर स्टार्टअप सुरू करण्यासाठी योग्य आहे, त्याबाबत...

टॉप १० शहरे-

  1. सॅन फ्रान्सिस्को 
  2. न्यूयॉर्क
  3. लंडन
  4. बोस्टन
  5. बीजिंग
  6. लॉस एन्जेलिस 
  7. तेल अविव 
  8. शांघाय
  9. सिएटल 
  10. सेऊल

भारतातील बंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद ही प्रमुख पाच शहरे स्टार्टअपसाठी पोषक मानली जातात.

२०१५ ते २०२२ दरम्यान

महत्त्वाची आकडेवारी

  • ९९,३८० डीपीआयआयटी मान्यताप्राप्त 
  • ३० राज्यांमध्ये धोरण 
  • ६४३ जिल्ह्यांत संधी
  • ७.२० लाख स्टार्टअपमधून रोजगारनिर्मिती
  • ११ रोजगार सरासरी एका स्टार्टअपमध्ये
  • ३७.५ हजार महिला संचालक
  • १,६२९ पेटंट दाखल

(स्रोत : स्टार्टअप इंडिया, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स)

टॅग्स :मुंबईअहमदाबादहैदराबादगुंतवणूक