व्याजदरांत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे १० वर्षांच्या रोख्यांच्या परताव्याने उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. यात डेट म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कसे ते पाहू...
डेट फंडांत गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डेट फंडांचा परतावा कमी असतो, मात्र आपले पैसे सुरक्षित असतात. जे गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी डेट फंडांचा पर्याय उत्तम आहे.
शॉर्ट ड्युरेशन फंड : यात फंड व्यवस्थापक क्रेडिट क्वालिटीच्या रोख्यांत गुंतवणूक करतात. शॉर्ट मॅच्युरिटीच्या रोख्यांवर व्याजदरातील चढ-उतारांचा कमी परिणाम होतो. जेव्हा व्याजदर वाढत असतात, तेव्हा यात गुंतवणूक करणे लाभदायक असते.
फ्लोटिंग रेट फंड : या योजनेत फंड व्यवस्थापक एकूण रकमेतील ६० टक्के हिस्सा फ्लोटिंग व्याजदर असणाऱ्या रोख्यांत लावतात. व्याजदर वाढताच रेफरंस रेट वाढतो. ३ वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना हे फंड परवडतात.
टार्गेट मॅच्युरिटी फंड : या फंडांची परिपक्वता तारीख आधीच निश्चित असते. यात प्रामुख्याने सरकारी रोखे आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे यात पैसे गुंतविले जातात. ३ वर्षांपेक्षा जास्त परिपक्वतेच्या टार्गेट मॅच्युरिटी फंडांचा परतावा ७ टक्क्यांपेक्षा अधिक असतो.
३ वर्षांतील डेट फंडांचा सरासरी परतावा
६.९१ टक्के फ्लोटिंग रेट, ६.५२ टक्के शॉर्ट ड्युरेशन, ७.३ टक्के टार्गेट मॅच्युरिटी, ८.१ टक्के क्रेडिट रिस्क