Lokmat Money > बिझनेस न्यूज > Restaurant Service Charges : आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही? सरकार लवकरच घेणार निर्णय 

Restaurant Service Charges : आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही? सरकार लवकरच घेणार निर्णय 

Restaurant Service Charges : यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, या संबंधित संघटना सहभागी होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:25 PM2022-05-23T19:25:18+5:302022-05-23T19:25:52+5:30

Restaurant Service Charges : यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, या संबंधित संघटना सहभागी होणार आहेत.

doca cautions restaurants on forced charging of service charges on consumers see here details | Restaurant Service Charges : आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही? सरकार लवकरच घेणार निर्णय 

Restaurant Service Charges : आता रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही? सरकार लवकरच घेणार निर्णय 

नवी दिल्ली : तुम्हाला जर रेस्टॉरंटमध्ये खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज भरावा लागणार नाही. रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांना सेवा शुल्क (Service Charge) भरण्यास भाग पाडू शकणार नाहीत. यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, या संबंधित संघटना सहभागी होणार आहेत.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित सिंग असतील. या बैठकीत एनआरएआयलाही (NRAI) बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याशिवाय,  Zomato, Swiggy, Delhivery, Zepto, Ola, Uber सारख्या पुरवठादारांनाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे. दरम्यान, कस्टमर हेल्पलाइनवर या विषयाच्या सततच्या तक्रारींनंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सेवा शुल्क मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
भारत सरकारने 21 एप्रिल 2017 रोजी सेवा शुल्काबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले होते की, अनेक वेळा ग्राहक बिलामध्ये सेवा शुल्क भरल्यानंतरही ते वेटरला स्वतंत्रपणे टिप देतात. त्यांना वाटते की, बिलामध्ये लावणारे शुल्क कराचा एक भाग  आहे. खाद्यपदार्थाची किंमत लिहिली आहे, त्यात  असे म्हटले जाते की सेवा ही अन्नाच्या किंमतीशी संबंधित आहे.

Web Title: doca cautions restaurants on forced charging of service charges on consumers see here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.